Month: October 2024

आनंद शिंदेंना ‘राजकीय सूर’ गवसणार?

 शरद पवारांची ताकद असलेल्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही मुंबई :  अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी बरेच जण इच्छुक आहेत. पक्षातच असलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे आता आमदारकीसाठी प्रयत्न करतायत. यामध्ये कलाकारही कुठे मागे नसल्याचं चित्र सध्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सयाजी शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आलेली आहे. आनंद शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली असून आनंद शिंदे त्यांचा मुलगा उत्कर्ष शिंदेच्या उमेदवारीसाठी आग्रह असल्यच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्याचप्रमाणे आनंद शिंदे यांनी मोहोळ, शिर्डी किंवा दक्षिण सोलापुरमध्ये उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळे आता शिंदे घराणं जर राजकारणाच्या वर्तुळात आलं तर निवडणुकीच्या रिंगणात स्वत: आनंद शिंदे उतरणार की उत्कर्षसाठी आग्रह धरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष दरम्यान आनंद शिंदे आग्रही असलेल्या मतदारसंघामध्ये शरद पवारांची ताकद आहे. त्यामुळे मोहोळ, शिर्डी आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघातून आनंद शिंदे हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जातंय. यावर आता शरद पवार काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं मागच्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींमुळे यंदाची विधानसभा निवडणुक ही अनेकांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर निकाल लागणार आहे. दरम्यान सध्या प्रत्येक राजकीय पक्षाकडून आता सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून जोरदार प्रचार देखील सुरु झालाय. नुकतीच भाजपने त्यांच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून आता कोणत्या उमेदवारांना यंदाच्या विधानसभेसाठी संधी मिळणार याची उत्सुकता आहे.

फ्रांस – भारत व्यापार संबंध दृढ होण्यासाठी महासंघामध्ये मुक्त व्यापार करार आवश्यक – राज्यपाल राधाकृष्णन

अशोक गायकवाड मुंबई : फ्रांस – भारत व्यापार संबंध दृढ होण्यासाठी भारत व युरोपिअन महासंघामध्ये मुक्त व्यापार करार होणे आवश्यक आहे असे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले. भारत…

तरुण मतदारांमध्ये ४६ हजारांनी वाढ

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू असून मतदारांना साद घालण्यात येत आहे. तर, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा मतदारसंघनिहाय तरुण मतदारांची…

 अशोक शिनगारे यांची भिवंडी व कल्याण येथील विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट

 स्ट्राँग रूम, मतमोजणी कक्ष, नामनिर्देशनबाबतच्या तयारीचा घेतला आढावा ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी…

माथेरानमधील मर्कटलीला पर्यटकांचे आकर्षण

माथेरान : माथेरान मध्ये चिक्की चपला प्रसिद्ध आहेत पण त्याचबरोबर इथले खास आकर्षण म्हणजे इथली माकडे आहेत. माथेरान मध्ये कुठेही गेल्यास माकडांच्या टोळ्या गटागटाने दिसतात.प्रत्येक पॉईंट्स वर ही माकडे आपल्या…

आमदार संजय केळकर यांचे ‘घर चलो’ अभियान

अनिल ठाणेकर ठाणे : भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं महायुतीचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला. हरिनिवास येथील दत्त मंदिर आणि…

ठाण्यात जन्म-मृत्यु दाखल्यांसाठी महिनाभराची प्रतिक्षा

नव्या प्रणालीतील तांत्रिक अडचणींचा नागरिकांना फटका ठाणे : केंद्र शासनाने जुनी नागरी नोंदणी प्रणाली (सीआरएस पोर्टल) संकेतस्थळ बंद ठेवून ती अद्ययावत करत चार महिन्यांपुर्वी कार्यान्वित केली असली तरी या संकेतस्थळामधील…

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट पाचवर छताच्या उभारणीस प्रारंभ

प्रवाशांचा उन, पावसात उभे राहण्याचा त्रास संपणार डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील दिवा बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागात छत उभारणीचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. मागील दोन…

  ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी महाराष्ट्रतील अनेक विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उतरवणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीता तूपसौंदर्य यांनी दिली. माण – खटाव विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र अवघडे यांना उमेदवारी…

जिल्हा निर्मितीचे दशक; तरी प्रश्नांचे शतक कायम

सागरी, नागरी, डोंगरी, शहरी जिल्ह्याच्या विकासाचा बोजवारा योगेश चांदेकर पालघरः वसई, विरार, पालघर, बोईसर यांचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे. कोकणपासून कोची अन् कोलकाता आसाममधून रोजगाराच्या शोधातील कष्टकऱ्यांचे लोंढे पालघर जिल्ह्यात…