जिल्हा निर्मितीचे दशक; तरी प्रश्नांचे शतक कायम
सागरी, नागरी, डोंगरी, शहरी जिल्ह्याच्या विकासाचा बोजवारा योगेश चांदेकर पालघरः वसई, विरार, पालघर, बोईसर यांचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे. कोकणपासून कोची अन् कोलकाता आसाममधून रोजगाराच्या शोधातील कष्टकऱ्यांचे लोंढे पालघर…
बचत गटांच्या सरस महोत्सवांना आचार संहितेची झळ.!
दिवाळी निमित्त होणाऱ्या आर्थिक उलाढालीत यंदा खंड ठाणे : दिवाळीच्या मुहूर्तावर विविध खाद्यपदार्थ, पणत्या, शोभेच्या वस्तू, विद्युत रोषणाई यांची महिला बचत गटांकडून जोरदार विक्री करण्यात येते. यासाठी जिल्हा…
शिवसेनेचे वामन म्हात्रे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार
शिवसेनेत दुसऱ्या बंडखोरीचे संकेत, २८ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार बदलापूर : महायुतीतील कुरबुऱ्या आता उघडपणे सुरू असून मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सोमवरी…
मुरबाडमधून सुभाष पवारांची बंडखोरी
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश, उमेदवारीवरही शिक्कामोर्तब बदलापूरः शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) पक्षात प्रवेश केला आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध लढण्यासाठी पवार तयारी करत होते. या प्रवेशासह त्यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथून शरद पवार गटातून इच्छुक असलेले बदलापुरचे शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघात एकेकाळी कॉंग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. सुरूवातीला शांताराम घोलप आणि पुढे गोटीराम पवार यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात राहिला. गोटीराम पवार यांच्या चार टर्म आमदारकीनंतर आता पुन्हा त्यांचे पुत्र सुभाष पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. काही वर्षांपूर्वी सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शिवसेनेने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदही दिले होते. त्यांच्याकडे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख पदही होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही ही जागा भाजपला गेल्याने इच्छुक असलेले सुभाष पवार यांची कोंडी झाली. पवार यांनी महाविकास आघाडीची दारे यापूर्वीच ठोठावली होती. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाकडे जाण्याची शक्यता असल्याने त्यांनी तसा संपर्क यापूर्वीच केल्याची माहिती होती. रविवारी भाजपने आपल्या पहिल्याच यादीत आमदार किसन कथोरे यांना येथून उमेदवारी जाहिर केल्यानंतर सुभाष पवार यांनी आपण निवडणूक तर लढणारच, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार हे निश्चित मानले जात होते. त्यानुसार सोमवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि माजी आमदार गोटिराम पवार यांच्या उपस्थितीत सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशासोबतच पवार यांना पक्षातर्फे उमेदवारीही मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता किसन कथोरे विरूद्ध सुभाष पवार असा पारंपारिक सामना होणार आहे. पवारांच्या प्रवेशाला आक्षेप ज्यांनी आज पक्षात प्रवेश केला ते ठेकेदार आहेत. वडिलांच्या पुण्याईवर यांचे राजकारण आहे. अशाप्रकारे पक्षानेही लोकांना प्रवेश आणि उमेदवारी देणे योग्य नाही. आम्ही पक्षासाठी काम करत आहोत. पक्षाने बाहेरून आलेल्या उमेदवाराला आणि ज्याने लोकसभेला पक्षविरोधी काम केले त्याला उमेदवारी दिल्यास आमचा विरोध राहिल. आम्ही निवडणूक लढवणार कशा पद्धतीने ते लवकरच जाहीर करू. – शैलेश वडनेरे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शऱद पवार) पक्ष, बदलापूर.
अकृषिक कराच्या जाचातुन मुक्तता केल्याने हाऊसिंग फेडरेशनकडून केळकर यांचा सत्कार
अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यानंतर महायुती सरकारकडून अकृषिक कर पूर्णतः माफ करण्यात आला. त्यामुळे अकृषिक (एन ए) कराच्या जिझिया ओझ्याने हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थांची कराच्या या जाचातून मुक्तता झाली. या निमित्त महाराष्ट्रातील साडेचार कोटी रहिवाश्यांच्यावतीने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने नुकतेच आमदार संजय केळकर यांचा जाहिर सत्कार केला. हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, फेडरेशनच्या संचालक शैलजा गस्ते, विनोद देसाई, संतोष साळुंखे आणि ॲड.अल्केश कदम आदीसह रहिवाशी उपस्थित होते. महाराष्ट्रात १ लाख २५ हजार गृहनिर्माण संस्था आहेत तर ठाणे जिल्ह्यात ३३ हजार आणि शहरात साडेचार हजार सोसायट्या आहेत. अकृषिक (एनए) कराच्या नोटीसांमुळे राज्यातील साडेचार कोटी रहिवासी हतबल झाले होते. हा एनए कर स्थगित करावा यासाठी ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन, पुणे हाऊसिंग फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. या बरोबरीने ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी विधीमंडळामध्ये तसेच, २०१८ ते २०२३ पर्यंत संबंधीत तीन मंत्र्यांकडे वारंवार बैठका घेऊन हा मुद्दा लावून धरला होता. एक घर आणि दोन कर हा जाच कशासाठी असा सवाल करीत सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन महसुल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी अकृषिक कर रद्द करण्यासाठी समिती नेमुन एनए कर वसुलीला स्थगिती दिली होती. तर, नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महायुती सरकारने अकृषिक कर पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतला. अखेर संजय केळकर आणि हाऊसिंग फेडरेशनने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले. यानिमित्ताने हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी शनिवारी आ. संजय केळकर यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन जाहिर सत्कार केला. 0000
राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाराशिवमध्ये
मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची २०२४-२५ वर्षातील सुवर्णमहोत्सवी (५० वी) कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनच्या यजमान पदाखाली धाराशिव (उस्मानाबाद) येथे आयोजित करण्यात येत असल्याची…
राष्ट्रीय स्तरावरील’कोकण रत्न’ राष्ट्रीय मेनू २०२५ शिबिर रत्नागिरीत
रत्नागिरी : अशोक गायकवाड* २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ५ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण रत्न’ हे मेनू शिबिर होत आहे, अशी माहिती कमांडींग ऑफीसर कमांडर के. राजेश कुमार यांनी दिली. ‘हमारा समुदंर हमारी शान’ हे ब्रीद घेऊन हे १० दिवसांचे शिबिर होणार आहे. ‘कोकण रत्न’ या शिबिराचा शुभांरभ ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता अल्ट्राटेक जेटीवर एससीसीचे एडीजी मेजर जनरल योगेंदर सिंग यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी ते जयगड ते बोरीया परत याच मार्गाने रत्नागिरी असा १२२ नॉटीकल मैल नौका भ्रमण असणार आहे. या शिबिरामध्ये पुणे, मुंबई अ आणि ब, नागपूर, औरंगाबाद, अमरावती व कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेड क्वार्टरमधून ६० राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट सहभागी होणार आहेत. पथनाट्यातून समुद्र स्वच्छतेविषयी विशेषत: सागरी किनारे स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे. ‘हमारा समुंदर, हमारी शान’ हे घोषित वाक्य घेऊन स्वच्छता, सुरक्षितता याविषयी जनजागृती होणार आहे. नौसेना आणि कोस्टगार्ड या दोघांचेही या शिबीरासाठी सहकार्य असणार आहे. पश्चिमी कमांडिंग युनिटच्या माध्यमातून हवामान बदल याबाबतची माहिती मिळणार आहे. तर कोस्टगार्डच्या माध्यमातून सर्च, रेस्क्यु, हेलिकॉप्टर आदींची मदत होणार आहे. एक सुरक्षा बोट, २ रेस्क्यु बोटी आणि नेव्हीचे सेलर यांचाही समावेश असणार आहे. यावेळी कार्यकारी अधिकारी अंकित रवी उपस्थित होते. 000
भारत व युरोपमधील मुक्त व्यापार धोरण मंजूर झाल्यास व्यापार दुपटीने वाढेल – राज्यपाल
मुंबई : अशोक गायकवाड भारत व युरोपमधील मुक्त व्यापार धोरण लवकर मंजूर झाल्यास त्याने उभयपक्षी व्यापार दुपटीने वाढेल, असे मत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केले. बेल्जियमचे राजे फिलिप यांच्या भगिनी असलेल्या प्रिन्सेस ऍस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जियम येथील व्यापार – उद्योजकांचे भव्य आर्थिक शिष्टमंडळ (बेल्जियम इकॉनॉमिक मिशन) येत्या मार्च महिन्यात भारत भेटीवर येणार असून त्यावेळी मिशनचे सदस्य दिल्लीसह मुंबईला भेट देणार असल्याची माहिती बेल्जीयमचेङङङ मुंबईतील वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी येथे दिली.वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी सोमवारी (दि. २१) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. बेल्जीयमचा महाराष्ट्र व गुजरातशी हिऱ्यांचा मोठा व्यापार असून बेल्जियम आता भारताशी लॉजिस्टिक्स, उत्पादन व आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेसोमवारी ळी सेमीकंडक्टर व्यापाराबद्दल देखील चर्चा होऊ शकते असे वाणिज्यदूतांनी सांगितले. बेल्जीयम आरोग्यसेवा क्षेत्रात अग्रेसर असून या क्षेत्रात आपण सहकार्य वाढविणार असल्याचे फ्रॅंक गिरकेंस यांनी सांगितले. भारत युरोप व्यापार वाढविण्याबाबत फेडरेशन ऑफ युरोपिअन बिझनेसेस इन इंडिया (फेबी) काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य वर्धन या क्षेत्रात देखील बेल्जीयम महाराष्ट्रातील कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
