कल्याण :   कल्याण परिमंडळ 3 मधील विविध पोलीसस्टेशन अंतर्गत मोकळी मैदानी, निर्जनस्थळे व रोडवरील आस्थापना यांच्यावर पोलिसांतर्फे धडक कारवाई सुरुबअसून 31 डिसेंबर अनुषंगाने विहित वेळेपेक्षा सुरू असलेल्या 35 आस्थापनावर  कारवाई. तसेच उघड्यावर व निर्जस्थळी नशेखोरांवर एकूण 75 कारवाई करण्यात आली आहे.  रात्री या ठिकाणी आशा एकुण 110  कारवाई करण्यात आली आहे.
तसेच रोडवरील अती वेगाने मोटार सायकल चालवणे आणि ट्रिपल सीट वाहन चालवणे. ड्रंक अँड ड्राईव्ह 210 करवाई अशा प्रकारे एकूण 320 कारवाई कल्याणमध्ये पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. पोलिसांची अशीच धडक कारवाई मोहिम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *