मुंबई : मंत्रिमंडळ समन्वय राखण्यासाठी १ प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू आहे. हळूहळू पेपर कॅबिनेट बंद करून ई कॅबिनेट प्रणाली राबवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रत्येकाला मंत्रालयात प्रवेश करताना फेस आयडी मिळणार आहे. मंत्रालयात येणारा प्रत्येक माणूस आयडेंटीफाय केला जाईल. ऑनलाईन रजिस्टर केल्यानंतर त्यांना मंत्रालयात प्रवेश करताना एक आयटडी मिळेल ते मंत्रालयातून बाहेर पडताना जमा करावे लागेल. यामुळे मंत्रालयात येणारी व्यक्ती किती वेळ थांबली, कुठे थांबली तसेच काय कामं केली. हे सर्व या माध्यमातून स्कॅन केले जाणार आहे. मंत्रालयात येणाऱ्या ७० टक्के तक्रारी या जिल्ह्यात सुटणाऱ्या असतात मंत्रालयातील ही अनावश्यक गर्दी कमी करण्यास देखील मदत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत संक्षिप्त पण अतिमहत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय.
शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी आणि त्यासाठी निकष शिथिल.
०००००
