अशोक गायकवाड
पनवेल : पनवेल महापालिकेच्यावतीने नवीन पनवेल मधील गणेश मार्केट जवळील भुखंडावर तात्पुरत्या स्वरूपात मच्छी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्या पार्श्वभुमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी या ठिकाणची अधिकाऱ्यांसह पाहणी करुन सूचना दिल्या.
नवीन पनवेल शिवा कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या बस डेपोजवळील भुखंड हा मच्छी मार्केट साठी राखीव असून मच्छी मार्केट उभारण्यात येणार आहे. तो पर्यंत मच्छी विक्रेत्यांना या ठिकाणी व्यवसाय करता यावा यासाठी तात्पुरत्या स्वरुपात या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. या ठिकाणची पनवेल महापालिकेचे माजी सभागृनेते परेश ठाकूर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेविका सुशीला घरत, राजश्री वावेकर, महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर उपस्थित होते.
००००
