ठाणे :ठाणे शहराचे शिल्पकार सतीश प्रधान यांचे श्रेय वादातीत आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी, ५ जानेवारी सायंकाळी ४.३० वाजता सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहात आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणेचे प्राचार्य प्राचार्य डॉ.गणेश भगुरे व ज्ञानसाधना ठाणेचे अध्यक्ष कमलेश प्रधान यांनी दिली आहे.
२९ डिसेंबर २०२४ रोजी सतीश प्रधान यांच्या दुःखद निधनामुळे अवघ्या ठाणे शहरावर शोककळा पसरली. ठाण्याचे शिल्पकार, द्रष्टे नेते, शिक्षण आणि क्रीडाक्षेत्रात ऐतिहासिक योगदान देणारे एक थोर समाजसेवक आपण गमावले. ठाणे नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आणि ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या एकूणच विकासाचा पाया घातला तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी अविरत कष्ट घेतले. ४४ वर्षांपूर्वी सतीश प्रधान यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना करून ठाण्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. ठाणे शहराला सुसंस्कृत, कलाप्रेमी तसेच विकासाभिमुखतेची मुद्रा प्राप्त करुन देण्यात सतीश प्रधान श्रेय वादातीत आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवार सायंकाळी ४.३० वाजता सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.
सतीश प्रधानसाहेबांवर प्रेम करणारे सुविद्य, सुजाण नागरिक, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी- प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. आपण या शोकसभेत उपस्थित राहून सतीश प्रधान साहेबांसारख्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाला मानवंदना द्यावी अशी विनंती सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणेचे प्राचार्य डॉ.गणेश भगुरे व ज्ञानसाधना ठाणेचे अध्यक्ष कमलेश प्रधान यांनी केली आहे.
00000