व्हिडीयो केला व्हायरल रात्री घरावर गोळ्या झाडणार पोलिसांकडून गुन्हा दाखल० शिवसैनिक आक्रमक
सिद्धेश शिगवर
ठाणे : ठाण्यातील एका माथेफीरू तरूणाने इंस्टाग्रामवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हितेश प्रभाकर धेंडे असे या २४ वर्षीय तरुणाचे नाव असून तो ठाण्यातील श्रीनगर वारली पाडा या भागात राहतो.
इंस्टावर व्हायरल केलेल्या व्हिडीयोत या तरुणाने रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचीधमकी दिली आहे. या व्हिडियोत तो अवार्च भाषेत शिंदेंबद्दल अपशब्दही वापरत असल्याने ठाण्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाणे गाठले. अखेर पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
हितेश धेंडे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिक श्रीनगर पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी फिर्याद दिली आहे. त्यावरुन त्याच्यावर श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत