मुंबई : पल्लवी फाउंडेशन आयोजित बाल जल्लोष हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे कुर्ला नेहरूनगर मनपा शाळा येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला. शिवसेनेचे खासदार मान. संजय राऊत साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ‘ आजचे हे विद्यार्थी उद्याचा भारत घडवणारे खरे शिल्पकार आहेत , त्यामुळे आज त्यांच्यावर चांगल्या संस्कारांची आणि कलागुण जोपासण्याची मेहनत घेणे आवश्यक आहे . आणि म्हणून असे कार्यक्रम होत राहणे गरजेचे आहे ‘ . असे मत त्यांनी इथे व्यक्त केले.
पल्लवी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाऊ कोरगावकर व सौ शलाका कोरगावकर मुलांना आनंद वाटेल अशा विविध उपक्रमांचे आयोजन करीत असतात .सकाळी प्रत्येक गटाच्या वेगवेगळ्या वेळेत चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या . सर्व विद्यार्थ्यांना यावेळी लेखन पॅड आणि ड्रॉइंग पेपर,चित्र देण्यात आले. त्यानंतर त्यांना दुपारी पुलाव – कोशिंबीर देवून घरी सोडण्यात आले.
नर्सरी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातील प्रत्त्येक गटातील खालील ५ विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली .
नर्सरी ते सिनिअर गट
१ अहिल्या बावधने, २ आरोही चांगले, ३ फातिमा गौरी, ४ दिशा कांबळे, ५ राजवी कांबळे, १ली व २री, १ सारा लोंढे, २ श्रीराज हुबाले, ३ वेदिका आवारे, ४ असता विश्वकर्मा, ५ काश्मी फरिया, 3री ते ४थी, १ अवनी भोर, २ सावनी चव्हाण, ३ संस्कृती सोनवणे, ४ नील सावंत, ५ अक्षरा पवार, ५वी ते ७ वी, १ मल्हार सरवदे, २ अनन्या परब, ३ अद्विका जाधव, ४ तनिष्का बोभाटे, ५ कृष्णप्रिया शेडे, ८ ते १० वी, १ मुग्धा नाईक, २ सोनम बनसोडे, ३ आदित्य वाद्रे, ४ निशांत चव्हाण, ५ आदित्य जाधव
संध्याकाळी पुन्हा मैदान विविध मनोरंजक खेळ , मुलांच्या आवडीच्या खाऊच्या स्टॉल, यांनी गजबजून गेले होते. मुलांनी त्याचा यथेच्छ आनंद घेतला. संध्याकाळी कार्यक्रमाच्या उत्तरार्धातील बक्षीस समारंभाच्या वेळी पल्लवी फाऊंडेशनला सर्वार्थाने मदत करणाऱ्या माया परिहार मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. त्यांनी उपस्थित सर्व मुलांना शुभाशीर्वाद दिले व संस्थेला सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. पल्लवी फाउंडेशन च्या हेमंत काळे, निलेश कोरगांवकर, जयदीप हांडे , पल्लवी पुजारी, तसेच प्रबोधन शाळेच्या शिक्षक व कर्मचारी वृंदाचे मोलाचे सहकार्य यावेळी लाभले.
0000
