अशोक गायकवाड
पनवेल : चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (स्वायत्त) येथे पारंपारिक दिवस-२०२५ संपन्न झाला. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील यांनी पारंपारिक दिवसाच्या औचित्याने देशाचा सांस्कृतिक वारसा जतन करून राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेत युवकजणांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचे प्रतिपादन केले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (स्वायत्त) येथे बुधवार,झाला. दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी पारंपारिक दिवसाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. या दिवशी महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक पेहराव धारण करून देशातील सांस्कृतिक आणि प्रादेशिक वैविध्य सादर करत “विविधतेतून एकते” चा संदेश दिला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण कक्षाच्या समन्वयिका डॉ. एम. ए. म्हात्रे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव, तिन्ही विद्याशाखांचे शाखाधिपती, जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, प्रा. अनिल नाक्ती व प्रा. प्रतिज्ञा पाटील, तसेच विविध विभागांच्या प्राध्यापकांनी एवं शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
00000
