ठाणे : १६ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील कानाकोप-यातून हजारोंच्या संख्येने युवा प्रशिक्षणार्थी आझाद मैदान, मुंबई येथे सहभागी झाले होते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून सरकार मायबापाने आमच्या मागण्यांवर गांर्भियपूर्वक विचार करून आता ज्या आस्थापनेत हे युवक कार्यरत आहेत, तेथेच कायम स्वरुपी नौकरी देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रसंगी आझाद मैदान, मुंबई येथे हजारो युवक-युवतींनी आपल्या मागण्यांकरीता जोरदार निदर्शने केले.सदर मोर्चाचे नेतृत्व लोकनेते माजी खासदार, माननीय हरिभाऊ राठोड त्याचप्रमाणे अनुप चव्हाण, अजय कौतुके, विशाल राठोड, सुरज मनवत, मनिषा काटदे, सुनिल गोळेकर, राजू पवार यांनी केले. मागण्या : या योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरुपी पदावर सेवेत सामावून घ्यावे.वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परिक्षा भरती प्रक्रियेध्ये प्रशिक्षणार्थ्यांना १०% राखीव (आरक्षित) जागा ठेवण्यात याव्यात.या आणि इतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर केले.
००००००