“क्रांतीसूर्याचं देणं” काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याची मुदत वाढ

ठाणे : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त (२०२६-२७), सार्थक साहित्य प्रकाशन यांच्या वतीने साकार होत असलेल्या “क्रांतीसूर्याचं देणं” या विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठविण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. राज्यभरातील कवी-लेखकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विनंतीचा विचार करून, आता कविता पाठविण्याची अंतिम मुदत  २४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. या ऐतिहासिक काव्यप्रकल्पासाठी कवींनी समता, सामाजिक न्याय, मानवता, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी जीवनकार्य, त्यांचे मौलिक विचार, विविध सत्याग्रह आणि विशेषतः महाडच्या चवदार तळ्याची क्रांती या विषयांवर आधारित आशयसंपन्न, विचारप्रवर्तक आणि मानवतावादी कविता पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या कवितांमधून केवळ निवडक आणि दर्जेदार कवितांचीच निवड करण्यात येणार असून, कविता स्वतःची, मौलिक व अप्रकाशित असणे अनिवार्य आहे. तसेच, प्रथम सहभाग नोंदविणाऱ्या कवींना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रा. आशा रणखांबे (सार्थक साहित्य प्रकाशन) तसेच साहित्यिक नवनाथ रणखांबे ९९६७४३५०३२ / ९९६७४८०९३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *