Month: April 2026

डान्सबार गर्ल ते ड्रग्ज सप्लायर

 अलिशान घरातून ६ कोटींचे ड्रग्ज जप्त, घरातून चालवत होती रॅकेट कल्याण : नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. अंमली पदार्थविरोधी विभागाने साकीनाक्यातून जप्त केलेल्या दोनशे एक्स्टेंसी गोळ्यांचे टिटवाळा कनेक्शन उघड झालं आहे. त्यानंतर टिटवाळाच्या हायप्रोफाइल सोसायटीत राहणाऱ्या अश्विनी पॉल या महिलेच्या घरी छापा टाकण्यात आला. तिच्या घरातून ६ कोटींच्या ५ हजार एक्स्टेंसी गोळ्या जप्त करुन तिला अटक करण्यात आली आहे. नेस्को प्रकरण उजेडात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल ढोले आणि पथकाने साकीनाका येथे छापा घालून २०० एक्स्टेंसी गोळ्या जप्त केल्या. हा साठा बाळगणाऱ्या इरफान अन्सारीला अटक केली. त्याच्या चौकशीतून पॉलचे नाव समोर आले. पॉल पूर्वी कल्याण येथे राहण्यास होती. दोन महिन्यांपूर्वीच ती टिटवाळा येथे शिफ्ट झाली होती. पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सलग तीन दिवस तांत्रिक पुराव्याच्या आधारे तिचा शोध सुरू केला. पथक तिच्या टिटवाळा येथील कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचले. त्यात तिचे घर शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यातून तिचा शोध घेत शनिवारी रात्री पथकाने घरी छापा टाकला. दरम्यान, तिच्या घरातून ६ कोटी किमतीच्या ५ हजार एक्स्टेंसी गोळ्या मिळून आल्याने पोलिसही चक्रावले. पोलिस आपल्यापर्यंत पोहचतील, असे तिला वाटले नव्हते. त्यामुळे ती बिनधास्त होती. पोलिसांनी इरफाननंतर सुफियान नावाच्या आरोपीला अटक केली. तो पॉल आणि इरफानमधला दुवा होता. पुढे सुफियानमुळे पोलिस पॉलपर्यंत पोहोचले. पॉल पूर्वी डान्स बारमध्ये काम करायची. तेथून बाहेर पडल्यानंतर ती ड्रग्ज सप्लायर बनल्याची माहिती आहे. तिची दोन लग्नं झाली आहेत. तिचा एक पती गुन्हेगार असून, तिची हिस्ट्री पोलिसांकडून काढण्यात येत आहे. पॉलकडून ४ ते ५ फोन आणि ७ ते ८ सीमकार्ड जप्त केली. पार्टी ड्रग्जच्या सप्लायसाठी ती या वेगवेगळ्या क्रमांकाचा तात्पुरत्या स्वरुपात वापर करत होती. तिच्या फोनमधून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या गोळ्यांवर मर्सिडीज, डॉलरसह वेगवेगळी चिन्हे, अक्षरे कोरलेली आहेत. यापूर्वी नेस्को ड्रग्ज पार्टीमध्ये जप्त केलेल्या गोळ्यांवर मर्सिडीजचे चिन्ह होते. तर वरळी पोलिसांनी जप्त केलेल्या गोळ्यांवर ऑडीचे चिन्ह होते. इरफानला अटक झाल्याबाबत पॉलला कल्पना नव्हती. पोलिस तिच्यापर्यंत कधीच पोहचू शकणार नाहीत, या विचाराने तिने एवढा साठा घरातच ठेवला. टिटवाळ्याच्या हायप्रोफाईल सोसायटीत राहणारी ‘ती’ मुंबईत ड्रग्ज जाळे पसरवत होती. डान्स बारमधून गुन्हेगारीच्या जगात आलेल्या या महिलेने घरातच ६ कोटींचा साठा दडवून ठेवला होता. पोलिसांनी धाडसी कारवाई करत तिचा हा बेबनाव उघड केला आहे.

डोंबिवली स्थानकात लोकलचे चाक घसरल्याने रेल्वेसेवा विस्कळीत

कल्याण : मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचे एक चाक रुळावरून घसरल्याची घटना सोमवारी सकाळी ८:०९ वाजता घडली. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ पावले उचलून सुमारे ६० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने…

पनवेलमध्ये ७५ अभंगांचे भव्य लोकार्पण भक्ती, संगीत आणि संस्कृतीचा सुरेल संगम

 लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षनिमित्त पनवेल : (अशोक गायकवाड )—-थोर दानशूर व्यक्तिमत्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त पनवेलमध्ये ‘अप्रचलित रागांवर आधारित ७५ अभंगांचे’ भव्य…

माथेरानमध्ये स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन

– जेष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुकुंद रांजाणे (माथेरान)जेष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात एसटी महामंडळ बसेसची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माथेरान मध्ये एम.एस.आर.टी.सी.( कर्जत ) आणि माथेरान जेष्ठ नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन श्रीराम चौकातील गेम झोन याठिकाणी करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. माथेरान शहरातील १८ वर्षावरील सर्व महिला,६५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिक, ७५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरीक या सर्वांकरिता महाराष्ट्र राज्यात सवलतीच्या दरात एसटी बसने प्रवास करताना स्मार्ट कार्डाचा वापर करता येणार आहे.हे कार्ड बनविण्यासाठी जेष्ठ नागरिकांना कर्जत आगारात जाणे शक्य नसल्याने कर्जत आगार प्रमुख महादेव पालवे यांच्या सहकार्याने आणि माथेरान जेष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन दि.१९ रोजी अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करण्यात आले. जवळपास नव्वद जेष्ठ नागरिकांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदवला.या शिबिराला विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी भेट देऊन जेष्ठ नागरिकांशी संवाद साधताना नगर परिषदेच्या माध्यमातून जे काही सहकार्य आवश्यक आहे ते निश्चितच केले जाईल असे सांगितले.यावेळी नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी कर्जतचे अक्षय म्हसे, गीता शहा यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. हा महत्वपूर्ण शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अब्दुल रहिमान शेख,उपाध्यक्ष अरविंद रांजाणे, सचिव अनंत शेलार, खजिनदार रजनी (बीना) कदम, सल्लागार चंद्रकांत जाधव, प्रकाश (अण्णा) सुतार,दत्ता सनगरे, वासंती जांभळे, कांचन केतकर, जयश्री रामाणे, सुहासिनी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. 00000000

 आयएसपीएल, एमपीटी, सीजीएसटीची विजयी सलामी

 आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा  महिलांच्या गटात श्रीराम, धर्मवीर, स्वस्तिक संघांचे विजय मुंबई, दि. १९ (क्री.प्र.)-कबड्डी संघ आणि कबड्डीपटूंना लाखमोलाचा पुरस्कार देणार्‍या क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या संयोजनाखाली सुरु झालेल्या…

कुर्ल्यात फिटनेस आणि एकतेचा उत्साह

 ५वी मायकेलाइट मॅरेथॉन कुर्ला पश्चिम येथील सिईएस माइकल हाय स्कूल द्वारा आयोजित ५वी मायकेलाइट मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमाने कुर्ला परिसरातील नागरिकांना एकत्र आणत एकता आणि उत्साहाची भावना…

टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धेतून चांगले खेळाडू घडतील – अजिंक्य नाईक

ठाणे – टेनिस क्रिकेटमधून करिअर सुरु करणारे अनेक खेळाडू आज मुंबई संघासाठी आणि आयपीएलमध्ये खेळत आहेत. ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून आयोजित टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धा हे एक मोठे व्यासपिठ असून…

एमटीएनएल, ऍडव्हान्स, पटेल व अशोक कामत सेमीफायनलमध्ये

आरएसए टी-२० कप मुंबई : रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित आरएसए टी-२० कप २०२५-२६ स्पर्धेत एमटीएनएल, ऍडव्हान्स सी.सी., पटेल सी.सी. आणि अशोक कामत सी.सी. या संघांनी दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश…

दहिसर येथे शिवसेनप्रमुख जन्मशताब्दी कॅरम स्पर्धेचे यशस्वी आयोजन

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेना शाखा क्रमांक २, दहिसर  वतीने  कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख…