Month: April 2026

शहापूरच्या माळरानावर ग्रह-नक्षत्रांची फुले फुलली

शहापूरच्या माळरानावर ग्रह-नक्षत्रांची फुले फुलली  ठाणे जिल्ह्यातील पहिल्या तारांगणाचे शहापूरला उद्घाटन ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण आणि अत्याधुनिक दुर्बिणीने सुसज्ज वेधशाळा शहापूर येथे उभारण्यात आली असून, खगोलप्रेमींसाठी हा एक मोठा आकर्षणबिंदू…

डोंगरी महोत्सवात उजळला ‘महाराष्ट्र तेजोत्सव’!

डोंगरी महोत्सवात उजळला ‘महाराष्ट्र तेजोत्सव’! दौलतनगरात प्रकाश, परंपरा आणि पर्यटनाचा जल्लोष पाटण (प्रतिनिधी) – तालुक्यातील दौलतनगर येथे रंगलेल्या डोंगरी महोत्सवात ‘महाराष्ट्र तेजोत्सव’ने अक्षरशः उजेडाची आणि उत्साहाची व संगीताची  बरसात झाली. डोंगररांगांच्या साक्षीने साजऱ्या झालेल्या या सोहळ्याने स्थानिकांसह पर्यटकांनाही मंत्रमुग्ध केले. या महाराष्ट्र तेजस्वी उत्सवाचे उद्घाटन पर्यटनमंत्री मा ना शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाले. आय रियालिटीज आणि महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला आधुनिक रोषणाईची झळाळी दिली. पर्यटनावर आधारित गाण्याचा जल्लोष उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राच्या पर्यटनावर आधारित खास गाण्याचे लोकार्पण यावेळी माननीय नामदार श्री शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले . या गाण्याचे लेखन  सुप्रसिद्ध गीतकार  सौ वर्षा राजेंद्र हुंजे मुंबई यांनी केले आहे, तर त्याचे संगीत निनाद सोलापूरकर यांनी दिले आहे. याच गाण्यावर सादर झालेल्या लाईट आणि साऊंड शोने प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकले. रंग, प्रकाश आणि सुरांच्या संगमाने दौलतनगरची रात्र अविस्मरणीय बनली. परंपरेचा भव्य आविष्कार या तेजोत्सवात ४० फुटांचे मावळे, वारली कलेच्या विविध छटा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असलेली वारकरी परंपरा हे प्रमुख आकर्षण ठरले. प्रत्येक सादरीकरणातून महाराष्ट्राच्या मातीतली ओळख जिवंत झाली. राज्यभर तेजोत्सवाची घोषणा यावेळी बोलताना मंत्री श्री शंभुराजे  देसाई यांनी ‘महाराष्ट्र तेजोत्सव’ राज्यातील विविध भागांत आयोजित करण्याची घोषणा केली. यामुळे पर्यटनाला चालना मिळून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अधिक व्यापक प्रचार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दौलतनगर बनले संस्कृतीचे केंद्रबिंदू या भव्य सोहळ्यामुळे दौलतनगर हे केवळ एक गाव न राहता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पर्यटन नकाशावर उजळून निघाले आहे. डोंगरी महोत्सवातील हा तेजोत्सव आगामी काळात राज्यातील सांस्कृतिक उत्सवांसाठी एक नवा मापदंड ठरणार, यात शंका नाही. कोट महाराष्ट्र तेजोत्सव सादर करताना महाराष्ट्राचे पर्यटन नजरेसमोर ठेवून त्याची आखणी करण्यात आली. याला नागरिकांसमोर मांडण्याची संधी पर्यटन विभागाने दिली. त्यामुळे महाराष्ट्राचे हे वैभव अधिक उजळपणे मांडण्याची संधी मिळेल. – प्रसाद आजगावकर, सीईओ, आय रियालिटी

 सिंधुदुर्गातल्या ५२ मंदिरांचा होणार कायापालट…!

सिंधुदुर्गातल्या ५२ मंदिरांचा होणार कायापालट…! ४ कोटी २१ लाखांचा निधी मंजूर…! सिंधुदुर्ग: जिल्हा वार्षिक योजनेतील क वर्ग यात्रा स्थळ विकास योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील ५२ मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या कायापालट होणार आहे आणि या मंदिरांचे रूपडे बदलणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील   मंदिरांचा विकास आणि कायापालट करण्यासाठी दरवर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून मंदिर परिसराचे सुशोभीकरण, संरक्षण भिंत उभारणे, पेव्हर ब्लॉक बसवणे भक्तनिवास बांधणे, पिण्याच्या पाण्याची  योजना यासारखी कामे केली जातात.त्यानुसार २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील ५२ मंदिरांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या कामांसाठी हा निधी मंजूर केला असून या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायत विभागाकडून करण्यात येत आहेत तालुका निहाय  कामांचा तपशील..! कणकवली : गांगो मंदिर फोंडाघाट,  (१५ लाख ),  गांगो – लिंग मंदिर, घोणसरी, (१५ लाख ), गांगेश्वर मंदिर लोरे (१० लाख ) देवगड : आरेश्वर मंदिर, आरे (२० लाख ),  हेदुलाई मंदिर,खुडी(२५ लाख), पावणाई मंदिर, किंजवडे (१० लाख). कुडाळ : भराडी मंदिर, वाडीवरवडे,  (५ लाख ),श्री स्वामी समर्थ मठ (६ लाख), सिद्ध महादेव मंदिर, केरवडे- नारुर(७ लाख ), गिरोबा मंदिर, बिबवणे (३ लाख ), सिमरा देवी मंदिर, रानबांबुळी (१५ लाख ), श्रीकृष्ण मंदिर, सोनवडे (५ लाख ),  पावणाई मंदिर, मोरे, (५ लाख ), देव कलेश्वर मंदिर, नेरूर (१० लाख), गिरोबा मंदिर, बिबवणे(५ लाख ), सातेरी मंदिर, अंजीवडे (५ लाख ),  लक्ष्मीनारायण मंदिर, आवळेगाव(५ लाख ), स्वयंभू मंदिर,पांग्रड(५ लाख), जटाशंकर मंदिर, केरवडे- नारूर(५ लाख ),  कलेश्वर मंदिर,नेरूर,  (१५ लाख ), गिरोबा  मंदिर, भडगाव बुद्रुक(१ लाख ), रामेश्वर मंदिर, आकेरी, (५ लाख ), लिंगेश्वर मंदिर, सोनवडे (५ लाख ). मालवण : मिर्लेश्वर -भगवती मंदिर, बुधवळे, (१४ लाख),लिंगेश्वर मंदिर, गुरामनगरी (६ लाख),भगवती मंदिर, देवली, (५ लाख ), गिरोबा मंदिर, नांदरुख (५ लाख ),गांगेश्वर मंदिर आडवली (५ लाख ), रामेश्वर -पावणाई मंदिर,असगणी, (४ लाख ), लिंगेश्वर मंदिर, श्रावण(४ लाख ), गांगेश्वर मंदिर, राठीवडे, (१५ लाख ) सावंतवाडी : सातेरी -माऊली मंदिर, नेतर्डे (१५ लाख ), पावणाई -रवळनाथ मंदीर पारपोली, (१० लाख)माऊली मंदिर, कवठणी,…

फेरीवाल्यांकडून ८० रुपयांवरून थेट २४० रुपये आकारल्याने संताप

फेरीवाल्यांकडून ८० रुपयांवरून थेट २४० रुपये आकारल्याने संताप भाजप नगरसेविका नीला सोन्स यांचा महानगरपालिका आणि ठेकेदारंविरुद्ध एल्गार मिरा – भाईंदर / अरविंद जोशी मीरा-भयंदर महानगरपालिका अधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचा कट रचत असल्याचा एक गंभीर प्रकरण समोर आला आहे. महानगरपालिकेने उभारलेल्या मंगलनगर आणि रामदेव पार्क येथील भाजी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत फेरीवाल्यांकडून प्रतिदिन ८० रुपये आकारले जात होते, परंतु महानगरपालिकेने त्यात थेट १५० टक्क्यांनी वाढ करून २४० रुपये केले आहेत. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे फेरीवाल्यांमध्ये मोठी चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. फेरीवाल्यांनी या निर्णयाचा निषेध करत महानगरपालिकेला एक निवेदन सादर केले होते, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्यांना नोटीस दिली आहे की, जर त्यांनी २४० रुपयांनुसार रक्कम भरली नाही, तर त्यांना जागा खाली करावी लागेल. भाजप नगरसेविका नीला सोन्स या संपूर्ण प्रकरणात फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. काल, मंगलनगर भाजी मार्केटमध्ये पोहोचलेल्या फेरीवाल्यांनी त्यांना घेराव घातला आणि आपल्या समस्या मांडल्या. नीला सोन्स म्हणाल्या की, मार्केट बांधताना बांधकामाचा खर्च भागवण्यासाठी कंत्राटदाराने ८० रुपये घेणे अपेक्षित होते, पण आता अतिरिक्त वसुली केली जात आहे. त्यांनी असा आरोप केला की, गेल्या दोन वर्षांपासून घेतलेल्या रकमेची कोणतीही पावती फेरीवाल्यांना देण्यात आलेली नाही, त्यामुळे पैशांच्या हिशोबावर शंका आहे. त्या पुढे म्हणाल्या की, वसुलीतून १०० रुपये नगरपालिकेला आणि १४० रुपये कंत्राटदाराला दिले जातील. मंगलनगर मार्केटमध्ये सुमारे १८० फेरीवाले आहेत, ज्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले जातात. नीला सोन्स यांनी सुचवले की, या डिजिटल युगात नगरपालिकेने थेट ऑनलाइन वसुली करावी आणि मधला कंत्राटदार काढून टाकावा, जेणेकरून फेरीवाल्यांना दिलासा मिळेल.