Month: June 2026

 केडीएमसीच्या कारवाईमुळे १,२०० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच केलेल्या कारवाईमुळे तिसाई शाळेत गोंधळ  कारवाई थांबवण्यासाठी प्रशासक आणि पालकांचे आवाहन कल्याण: कल्याण-बिवली महानगरपालिकेने कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरातील तिसाई शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे चालवल्या जाणाऱ्या तिसाई शाळेची इमारत…

 आठवडी बाजार बंद करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेला मोर्चा काढण्याची नामुष्की

केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा कल्याण : आठवडी बाजार तात्काळ बंद करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या  ‘ई’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत आंदोलनात महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना (शिंदे) उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीण  तालुका प्रमुख गजानन पाटील  यांनी केले. काळूबाई चौक येथून सुरू झालेला मोर्चा ‘ई’ प्रभाग कार्यालयावर धडकला. मात्र केडीएमसीमध्ये शिवसेना सत्तेत असतांना देखील प्रशासनावर अंकुश नसल्याने सत्ताधारी शिवसेनेला मोर्चा काढण्याची नामुष्की ओढवल्याची चर्चा यामुळे रंगली होती. आंदोलनकर्त्यांनी महापालिका हद्दीतील सर्व आठवडी बाजार तात्काळ बंद करण्याची मागणी करत प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला. साप्ताहिक बाजारांमुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले की, गेल्या महिन्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आठवडी बाजार बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. आठवडी बाजारांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ०००००

 महावितरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात खासदार नरेश म्हस्के आक्रमक

नवी मुंबई – ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होणं, केबल जळण्याच्या घटना, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड…

 शहर विकास विभाग, गावदेवी मार्केट आणि कळवा रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

 ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची मागणी ठाणे -ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागात नुकतीच लागलेली आग, गावदेवी मार्केटमधील भीषण दुर्घटना आणि कळवा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या ठाणे…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे १४ जून रोजी संगीत कार्यक्रम

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येथे रविवार, १४ जून २०२६ या दिवशी सायंकाळी पाच वाजता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रीमती अनुजा झोकरकर…

समृद्धी महामार्गावरील अनधिकृत ट्रक पार्किंगमुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका

तातडीच्या कारवाईची मनसेची मागणी कल्याण : राज्याच्या महत्त्वाकांक्षी आणि अतिवेगवान वाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते आसनगाव तसेच निंबवली टोल प्लाझा परिसरामध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर ट्रक, ट्रेलर, कंटेनर आणि इतर अवजड वाहने अनधिकृतरित्या रस्त्याच्या कडेला व वाहतूक लेनमध्ये उभी केली जात असल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित विभागाकडे तक्रार वजा निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे तक्रार वजा निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख उल्हास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना उपाध्यक्ष ॲड. अविनाश शिळकंदे, दिलीप राठोड, भाऊसाहेब घोडके तसेच रोहित जोशी उपस्थित होते. मनसेच्या निवेदनानुसार, समृद्धी महामार्ग हा अतिवेगवान वाहतुकीसाठी विकसित करण्यात आला असून दररोज हजारो नागरिक, खासगी वाहने, प्रवासी बस तसेच मालवाहतूक करणारी अवजड वाहने या मार्गाचा वापर करतात. मात्र इगतपुरी ते आसनगाव या दरम्यान आणि विशेषतः निंबवली टोल प्लाझा परिसरात अनेक किलोमीटरपर्यंत ट्रक व कंटेनरच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. काही ठिकाणी तर रस्त्याच्या दोन ते तीन लेनपर्यंत ही वाहने उभी असल्याने प्रत्यक्ष वाहतुकीसाठी केवळ एकच लेन उपलब्ध राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्रीच्या वेळी कमी दृश्यमानता, पावसाळी वातावरण, धुके अथवा वाहनांचा वेग लक्षात घेता अशा प्रकारे उभी असलेली वाहने चालकांच्या लक्षात वेळेत न आल्यास भीषण अपघात घडू शकतो. विशेषतः मागून येणाऱ्या वाहनांना अचानक लेन बदलावी लागत असल्याने साखळी अपघात, वाहनांचे नियंत्रण सुटणे तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येबाबत पोलिस प्रशासन तसेच निंबवली टोल नाक्यावरील अधिकारी सातत्याने रस्ते विकास महामंडळ व संबंधित महामार्ग प्राधिकरण यांच्याशी पत्रव्यवहार करीत आहेत. विविध माध्यमांतून या प्रश्नाची दखल घेण्याची विनंती करण्यात आली असून परिस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. मात्र, संबंधित प्राधिकरणाकडून या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. याप्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग असला तरी त्यावरील सुरक्षा धोक्यात येऊ देणार नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. 00000000000000

 परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी

 नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीची मागणी.. नागपूर -एप्रिल महिन्यात अमरावती जिल्ह्याच्या परतवाड्यामध्ये जे सेक्स स्कॅण्डल उघडकीस आले, ते लव्ह जिहाद चे प्रकरण असल्याचे ठोस पुरावे जरी नसले तरी संशय…

 मोदानी सरकार ‘अदानी’वर मेहरबान

बेस्ट डेपो, निसर्ग उद्यान, मिठी नदीच्या परिसरासह मुंबईतील शेकडो एकर जमीन मोफत अदानीच्या खिशात – खा. वर्षा गायकवाड. मुंबई : मोदानी सरकार अदानीवर मेहरबान झालेले असून धारावी प्रकल्पाच्या नावाखाली या सरकारने मुंबईतील महत्वाच्या जागा अदानीला मोफत दिल्या आहेत. बेस्ट डेपो, निसर्ग उद्यान, रेल्वेची जमीन, मदर डेअरीची जमीन, मिठी नदीचा परिसर हे सर्व दिले आहे आणि सर्व नियम धाब्यावर बसवून हजारो वृक्षांची कत्तल करून पर्यावरणाचा ऱ्हासही केला जात आहे. हे सर्व फक्त आणि फक्त अदानीसाठीच केले जात आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, धारावी पुनर्वसन प्रकल्प हा धारावीची ओळख पुसून टाकणारा आहे. धारावीकरांना बाहेर हुसकावून लावणे व लाडके उद्योगपती अदानी यांचा विकास करण्यासाठी हा प्रकल्प आहे. धारावीकरांना धारावीतच घरे मिळावीत, ज्यांची दुकाने आहेत, उद्योग आहेत, त्यांचे पुनर्वसनही त्याच जागेवर झाले पाहिजे ही मागणी असताना सरकार मात्र अदानीचे लाड पुरवण्यासाठी पात्र अपात्रतेचा खेळ करून हजारो धारावीकरांना धारावी बाहेर पाठवत आहे. सर्वेच्या नावाखाली गुंडांच्या मदतीने स्थानिकांना धमकावले जात आहे. अदानीचे लोक व फडणवीस व मोदानी सरकार हातात हात घालून धारावीकांना हुसकावून लावण्यासाठी काम करत आहे. खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लोकप्रतिनिधींनाही फडणविसांचे पोलीस व प्रशासन जुमानत नाहीत, उलट उद्धट उत्तरे देऊन कारवाई करण्याची धमकी देतात. अदानीची सुपारी घेऊन भाजपा महायुती सरकार काम करत आहे. धारावी संदर्भात एक लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने रस्त्यावर आवाज उठवला, सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली पण थातूर मातूर उत्तरे दिली जातात, हा आमचा अनुभव आहे. महायुती सरकार व त्यांचे बगलबच्चे अदानीची वकिली करतात व धारावीकरांना वाऱ्यावर सोडत आहेत. आता सिंगापूर-हाँगकाँगचे जे गाजर दाखवले आहे ते अदानीचे साम्राज्य उभे करण्यासाठी आहे. सर्वसामान्य धारावीकरांना असे गुलाबी स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक करू नका, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. धारावीतून मुळ धारावीकरांना बाहेर हाकलून अदानीचे टॉवर उभे करण्यासाठी मोदी-शाह व फडणवीसांचे सरकार पायघड्या घालत आहे. एकीकडे धारावीकरांना त्याच जागेवर घरे व दुकानांना जागा मिळावी यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे पण अदानीसाठी सर्व रान मोकळे आहे. फडणवीस सरकार धारावीच्या विकासाच्या मोठ्या गप्पा मारत आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. आताही धारावीचा विकास हाँगकाँग-सिंगापूरच्या धर्तीवर करु ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा म्हणजे केवळ भुलभलैय्या आहे. मोदानीच्या शब्दावर धारावीकरांचा विश्वास नाही, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. 00000000000

ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध

आवश्यक ती सकारात्मक पावले उचलली जातील, सुनेत्रा पवारांनी दिला विश्वास मुंबई दि. ९ जून – ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची जनता दरबारात भेट घेतली. दरम्यान यावेळी जनतेने विश्वास देणारी त्यांच्या कार्याची झलक अनुभवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांचा जनता दरबार आजही प्रचंड गर्दीत पार पडला. आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देत आणि काहींच्या समस्या ऐकून त्यावर काय उपाययोजना करता येईल याबद्दल संवाद साधत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. अनेक शिष्टमंडळ, अनेक वैयक्तिक समस्या तर काहींच्या विकासकामांच्या समस्या घेऊन आलेले लोक या जनता दरबारात पहायला मिळाले. छांव फाऊंडेशनचे संस्थापक आलोक दीक्षित, ॲड. पूजा मोती तसेच ॲसिड हिंसाचारातून संघर्ष करत नव्याने आयुष्य उभारणाऱ्या महिलांनी ॲसिड विक्रीवर कठोर नियंत्रण, प्रभावी देखरेख आणि कडक नियम करण्याबाबतचे निवेदन यावेळी श्रीमती सुनेत्रा पवार यांना दिले. आयुष्यात कठोर संघर्ष करणाऱ्या महिलांच्या वेदना आणि अपेक्षा एका संवेदनशील महिला नेतृत्वापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या शिष्टमंडळाने केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी आलेल्या प्रतिनिधींचे आत्मियतेने म्हणणे ऐकून घेत त्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांचा संघर्ष हा केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण समाजाला अधिक संवेदनशील आणि जबाबदार बनविणारा आहे. त्यांच्या सन्मानपूर्ण पुनर्वसनासाठी, सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षित समाजाच्या निर्मितीसाठी महायुती सरकार कटिबद्ध असून आवश्यक ती सकारात्मक पावले उचलली जातील असा विश्वास सुनेत्रावहिनी पवार यांनी छांव संस्थेला दिला. 0000000000