Month: June 2026

 बौद्धांना जनगणनेपासून परावृत्त करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

माहिती दडवणे , खोटी माहिती देणे म्हणजे तीन वर्षे तुरुंगवासाचा गुन्हा ! मुंबई : स्वतः जात प्रमाणपत्रधारक आणि आरक्षणाचे लाभार्थी असतानाही राज्यात काही लोक अनुसूचित जातींना जनगणनेत जात नोंदवण्यापासून जाहीर सभा, सोशल मीडिया व इतर माध्यमांतून परावृत्त करू लागले आहेत. त्याची वेळीच गंभीर दखल घेवून त्यांच्यावर केंद्र आणि राज्य सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी बौद्ध – अनुसूचित जाती एकता परिषदेतर्फे आज  मुंबईत करण्यात आली आहे. या संदर्भात बौद्ध – अनुसूचित जाती एकता परिषदेच्या संयोजन समितीचे सदस्य महेंद्र बनसोडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्य जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण, राज्य जनगणना संचालिका डॉ. निरुपमा जे. डांगे,  महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय शिरसाट यांना निवेदने सादर केली आहेत. बनसोडे हे युनिव्हर्सल बुद्धिस्ट सोसायटीचेही संस्थापक – अध्यक्ष आहेत. ओबीसींच्या मागणीनुसार देशात प्रथमच जातीनिहाय जनगणना होत आहे. अशा वेळी अनुसूचित जातींचा दर्जा दिलेल्या बौद्ध समाजाला त्यापासून अलिप्त राहण्यासाठी प्रवृत्त करणे म्हणजे जनगणनेच्या उद्दिष्टांना पराभूत करणे आहे,असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय कार्यात अडथळा जातीचा दाखला नमुना क्रमांक : ६ आणि नमुना क्रमांक : ७ नवबौद्ध हे दोन्ही प्रकारचे प्रमाणपत्र घेणाऱ्या लोकांना आरक्षण हे अनुसूचित जाती म्हणुनच मिळते. त्या नुसार अनुसूचित जातीचे सर्व अधिकार घेऊनही स्वतः अनुसूचित जातीची नोंद न करणे आणि इतरांनाही त्याची नोंद करण्यापासून परावृत करणे या कारवाया जनगणना विरोधी असून राष्ट्रीय कार्यात अडथळा आणणाऱ्या आहेत, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जनगणना अधिनियम १९४८ कलम ११ नुसार शिक्षापात्र गुन्हा जनगणना कर्मचाऱ्यांना खोटी माहिती दिल्यास किंवा माहिती लपवल्यास ‘जनगणना अधिनियम १९४८’ च्या कलम ११ नुसार कारवाई होऊन, दंडासह ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, याकडे बनसोडे यांनी जनगणना आयोगाचे लक्ष वेधले आहे. अनुसूचित जातींची अचूक माहिती नोंदवण्यासाठी एक जनजागृती अभियान हाती घेण्यात यावे, अशी आग्रही मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे. भारत सरकारद्वारे करण्यात येणारी जनगणना ही देशाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक धोरण निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. विशेषतः अनुसूचित जातींची लोकसंख्या, सामाजिक प्रतिनिधित्व, विकास योजना व घटनात्मक हक्क यांचे मूल्यमापन जनगणनेतील अचूक माहितीवरच अवलंबून असते, असे त्यांनी सांगितले. 0000000000

 तलासरी पोलिसांकडून घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत छडा

 करजगाव घरफोडी प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसह, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त योगेश चांदेकर  पालघरः तलासरी तालुक्यातील करजगाव, पाटील पाडा येथे घरफोडी करून त्यात तीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर अवघ्या ४८ तासांत या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तीन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान अजय नरेश घुटे हे पाटीलपाडा, करजगाव हे त्यांचे राहते घर  बंद करून त्यांच्या दुकानात गेले होते. घरी कुणी नाही, याबाबत पाळत ठेवून १६ ‍वर्षांच्या मुलाने त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा तोडला. घरात प्रवेश करून लोखंडी कपाट तोडले. त्यातील तीन लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. या प्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष पथकाची कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याबाबत तलासरी पोलिसांना तातडीने या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला. त्यांच्या सूचनेनुसार या प्रकरणाचा त तपास करण्यासाठी तलासरी पोलिसांनी एक विशेष पोलिस पथक तयार केले. या परिसरातील सीटीव्ही कॅमेरे, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका अल्पवयीन मुलाकडे संशयाची सुई जात होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख रुपये रोख, दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि पाचशे रुपये किमतीची बॅग असा एकूण तीन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देशमुख यांच्या काळात तपासाची वाढली गती पालघर जिल्ह्यात यतीश देशमुख पोलिस अधीक्षक म्हणून आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीला बऱ्यापैकी आळा घालण्यात यश मिळवले आहे. वारंवार विविध पोलिस ठाण्यांना मार्गदर्शन करून तपासाची सूत्रे कशी फिरवावीत याचे निर्देश ते देत असतात. पालघर जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांच्या योजनेतील पहिल्या क्रमांकाचे बक्षीसही देशमुख यांच्या काळातच मिळाले. आत्ताच्या करजगाव घटनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजय गोरड, पोलिस उपनिरीक्षक विष्णू राजड, संदीप नांगरे, अनिल सोनवणे, योगेश मुळे यांच्या पथकाने अवघ्या ४८ तासात घरफोडीचा तपास करून मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

१६ वर्षांखालील मुले गटात डॉन बॉस्को एससी अजिंक्य

१५वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा अंतिम फेरीत रिपब्लिकन्स एससीवर विजय मुंबई, ९ जून: १५ व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेच्या १६ वर्षांखालील मुले गटात डॉन बॉस्को एससी अजिंक्य ठरला. चुरशीच्या अंतिम फेरीत त्यांनी रिपब्लिकन्स एससीवर ३-२ विजय असा विजय मिळवला. एएचडब्ल्यूए आयोजित वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलच्या टर्फ मैदानावर खेळल्या गेलेल्या स्पर्धेत १६ वर्षांखालील मुले गटाच्या फायनलमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. त्यात रॉयडेन कोळी, अर्णव खोत आणि सार्थ हिरामठच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर  डॉन बॉस्को एससीने वर्चस्व राखले. मात्र, रिपब्लिकन्स एससीकडून चिंगशुबम हेथोइबा व शुभम शिंदेने गोल करून सामन्यात रंगत आणली. वरिष्ठ महिला गटात वॉरियर्स एससीला २-० असे हरवत सी व्ह्यू एससीने जेतेपद पटकावले. रेश्मा महाडिकने दोन्ही गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. व्हेटरन्स पुरुष गटाच्या अंतिम फेरीत हॉकी मीरा रोडने मुंबई कस्टम्सवर १-० अशी मात केली. सामन्यातील मॅचविनर गोल मेघराज एस.याने केला. निकाल (१६ वर्षांखालील मुले – अंतिम सामना): डॉन बॉस्को एससी ३ (रॉयडेन कोळी, अर्णव खोत, सार्थ हिरामठ) विजयी वि. रिपब्लिकन्स एससी २ (चिंगशुबम हेथोइबा, शुभम शिंदे). वरिष्ठ महिला (अंतिम सामना): सी व्ह्यू एससी २(रेश्मा महाडिक) विजयी वि. वॉरियर्स एससी ०. व्हेटरन्स पुरुष (अंतिम सामना): हॉकी मीरा रोड १ (मेघराज एस.) विजयी वि. मुंबई कस्टम्स ०. 00000000

नालेसफाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनोखे ‘गटर पूजन’ आंदोलन

दिवा, दि. 9 जून : दिवा शहरातील नालेसफाईची कामे अद्यापही अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना पुराचा सामना करावा लागू शकतो. ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने…

पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!

 शिवसैनिकांचे ‘टमरेल’ आंदोलन आणि महापालिकेवर धडक मोर्चा! मिरा-भाईंदर :मिरा-भाईंदर शहरातील जनतेचा पाण्यासाठी सुरू असलेला टाहो आणि प्रशासनाची निर्लज्ज लाचारी या विरोधात शिवसेना पक्षाच्या वतीने ‘टमरेल आंदोलन’ छेडत महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. भाईंदर (पश्चिम) येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून निघालेल्या या मोर्चात शिवसैनिक हातात ‘टमरेल’ घेऊन प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरली होती. “पाणी द्या, पाणी द्या, त्रस्त जनतेला पाणी द्या!”, “प्रशासकीय लाचारीचा धिक्कार असो!” अशा घोषणांनी संपूर्ण महानगरपालिका परिसर दणदणून गेला. संतापलेल्या आंदोलकांनी थेट आयुक्त आणि महापौर दालनाकडे कूच केली, मात्र नेहमीप्रमाणे जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढणारे महापौर आणि आयुक्त दोघेही दालनात उपस्थित नव्हते. या पळपुटेपणावर शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि महापौरांना दूरध्वनीवरून थेट संपर्क साधून त्यांच्या ‘मौन’ धारण करण्यावर कडक शब्दांत जाब विचारला. अखेर, हे आक्रमक निवेदन महानगरपालिका उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील आणि उपायुक्त संभाजी पानपट्टे यांच्याकडे सोपविण्यात आले. शिवसेनेच्या मुख्य मागण्या आणि चेतावणी: १. पाणीपुरवठा तातडीने पूर्ववत करा: शहरातील प्रत्येक टोकाच्या भागात, चाळी-झोपडपट्ट्यांमध्ये नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा २४ तासांच्या आत सुरळीत झालाच पाहिजे! २. टँकरमाफियांची लूट थांबवा: ज्या भागात ३-४ दिवस पाणी आलेले नाही, तिथे महापालिकेने स्वतःच्या खर्चाने तात्काळ टँकरद्वारे पाणी मोफत पुरवावे. टँकर माफियांची मुजोरी ठेचून काढा! ३. पारदर्शक वेळापत्रक जाहीर करा: पाण्यासाठी नागरिकांना ३-४ दिवस ताटकळत ठेवणे बंद करून पाणीपुरवठ्याचे अचूक वेळापत्रक जाहीर करा आणि त्याचे काटेकोर पालन करा. ४. पाणीचोरांवर FIR दाखल करा: शहरात चालणारी अधिकृत-अनधिकृत पाणीचोरी आणि अवैध नळ जोडण्यांवर तात्काळ गुन्हे (FIR) दाखल करून युद्धपातळीवर विशेष मोहीम राबवा. ५. ‘७/११’ कंपनीची अडीबाजी मोडून काढा: महापालिकेने प्रशासकीय बळाचा वापर करून ७/११ कंपनीच्या जागेचा वाद तात्काळ निकाली काढावा आणि सूर्या धरणाचे पाणी शहरात आणण्याचा मार्ग मोकळा करावा! या ‘टमरेल आंदोलना’बद्दल बोलताना मिरा -भाईंदर महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर म्हणतात की, “जनतेच्या संयमाचा आता अंत झाला आहे. कडाक्याच्या उन्हात आमच्या माता-भगिनींना रस्त्यावर उतरायला लावणाऱ्या प्रशासनाला आम्ही आता सुखाने जगू देणार नाही. या निवेदनाची आणि जनतेच्या आक्रोशाची प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास यानंतर शहरात निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णतः महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार असतील!”

सहा वर्षे, हिमालयाएवढा लढा –  भारताच्या ‘झोझिला’ यशामागील कहाणी

बालताल (जम्मू-काश्मीर), ९ जून: मंगळवारी जेव्हा हिमालयात शेवटचा स्फोट झाला आणि ‘झोझिला बोगद्या’ची (Zojila Tunnel) दोन्ही टोके एकमेकांना जोडली गेली, तेव्हा ती केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वाची कामगिरी नव्हती. हिमवादळे,…

कोकणची कैफियत मांडण्यासाठी  शनिवारी दादरमध्ये जाहीर मेळावा

मुंबई, दि. : सर्वाधिक काजू उत्पादन कोकणात असताना काजू बाजारपेठ मात्र पश्चिम महाराष्ट्रात, सागर किनाऱ्याच्या सानिध्यामुळे सर्वाधिक मासेमारी होत असताना मत्स्य विद्यापीठ मात्र नागपूरला दुसरीकडे प्रदूषणामुळे इटलीने बंद केलेली रसायन…

इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व कामाला सुरुवात

 उल्हासनगरातील पॅनल क्रमांक ७ मधील सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक ७ मधील इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. बऱ्याच वर्षापासून या रस्त्याचे काम झाले नव्हते. पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी कंपनी मालकांसह परिसरातील उद्योजकांकडून केली जात होती. अखेर इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाची भूमिपूजन माजी आमदार पप्पू कलानी व महापौर अश्विनी निकम यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्याचवेळी त्या रस्त्याचे काम देखील सुरू करण्यात आले. महापौर अश्विनी निकम यांनी पॅनल क्रमांक ७ मधील विकास कामांना गती देत त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी जवळपास ४० करोड रुपयांचा मूलभूत सुविधा निधी उपलब्ध करण्यात आले असून याच निधीच्या अंतर्गत सुमारे एक करोड रुपयांच्या निधीतून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी, व्यापारी वर्गांनी महापौर अश्विनी निकम यांचे आभार प्रकट केले आहे. या रस्त्याच्या निर्मनामुळे इंडस्ट्रियल एरियाच्या परिसराची शोभा वाढली आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, सभागृह नेता अरुण आशान, नगरसेवक जमनादास पुरसवाणी, दुर्गा राय, नगरसेविका संघमित्रा हजारे, कमलेश निकम, राजवानी यांच्यासह परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ७ मध्ये हा रस्ता सिमेंट काँक्रिटी तयार करण्यात येणार आहे. इंडस्ट्रियल एरियाचा हा सिमेंट काँक्रिटी रस्ता २० दिवसाच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याचे कमलेश निकम यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या दिर्घायुष्यासाठी गावदेवी मंदिरात आज महाआरती

ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्यातर्फे आयोजन ठाणे : सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषविणारे नरेंद्र मोदी यांच्या दिर्घायुष्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्यातर्फे बुधवारी सकाळी १० वाजता गावदेवी मंदिरात महाआरती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान म्हणून गौरव प्राप्त केला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्याबरोबरच उज्ज्वल भविष्यासाठी महाआरती करण्याची सूचना भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली होती. त्यानुसार नौपाड्यातील गोखले रोडवरील गांवदेवी मंदिरात भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते बुधवारी सकाळी १० वाजता महाआरती करण्यात येणार आहे. ठाण्याचे ग्रामदेवत असलेल्या श्री गांवदेवी मंदिराला १२५ वर्ष पूर्ण झाली आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गांवदेवी मंदिराच्या माध्यमातून ठाण्याच्या धार्मिक, सांस्कृतिक इतिहासाची साक्ष मिळते. या मंदिरात महाआरतीचा गजर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आशीर्वाद मागण्यात येणार आहे.

आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आज वह्यावाटप आणि सत्कार

ठाणे : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे गडकरी रंगायतनमध्ये बुधवारी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यावाटप व ६० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे. भाजपच्या नगरसेविका…