Month: June 2026

नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर महानगरपालिकेमार्फत सखोल स्वच्छता मोहीमा

नवी मुंबई – स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या सुपरस्वच्छ लिगमध्ये समाविष्ट शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई शहरातील दैनंदिन स्वच्छतेकडे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे.…

वैद्यकीय परिषदेतील सदस्यांची निवडणूक पद्धत रद्द करा

आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी मुंबई, दि. (प्रतिनिधी) : राज्य सरकारने वैद्यकीय परिषदेमधील सदस्यांची निवडणूक पध्दत रद्द करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा व पुर्वीप्रमाणे महाराष्ट्र वैद्यकीय निवडणूक पध्दत कायम ठेवण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी एका पत्राद्वारे केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेच्या मुंबई शाखेच्या वतीने शिवसेना नेते आणि दिंडोशीचे  आमदार सुनील प्रभू यांना लेखी पत्र दिले आहे. या पत्रात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही सुमारे १८ लाखाहून अधिक डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणारी वैधानिक स्वायत्त व नियामक संस्था असून सध्याची निवडणूक पद्धत ही लोकशाही तत्त्वांवर आधारित आहे व ती पारदर्शकता उत्तरदायित्व व वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग सुनिश्चित करते. नाम निर्देशन पद्धती लागू केल्यास परिषदेचे प्रतिनिधी स्वरूप लायाला जाईल. वैद्यकीय समुदायात प्रती उत्तरदायित्व घटेल. परिषदेची स्वायत्तता व निष्पक्षता बाधित होऊ शकते. निर्णय प्रक्रिये बाबत शंका व अविश्वास निर्माण होऊ शकतो. इंडियन मेडिकल असोसिएशन ही आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना असून व्यावसायिक स्वनियमानासाठी लोकशाही पद्धत अत्यंत आवश्यक असल्याचे आम्ही मानतो असे लिहीत शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांना विनंती करीत वैद्यकीय क्षेत्रातील या गंभीर चिंतेची दखल घ्यावी असे सांगितले. दरम्यान या सर्व बाबींची दखल घेत शिवसेना नेते, दिंडोशीचे शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परिषदेची स्वायत्तता कायम ठेवण्यासाठी आपण सकारात्मक हस्तक्षेप करून मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबाबत पुनर्विचार करून अधिनियमात बदल करावा अशी विनंती केली आहे.

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीची मागणी.. नागपूर – एप्रिल महिन्यात अमरावती जिल्ह्याच्या परतवाड्यामध्ये जे सेक्स स्कॅण्डल उघडकीस आले, ते लव्ह जिहाद चे प्रकरण असल्याचे ठोस पुरावे जरी नसले तरी संशय घेण्यास वाव आहे. त्यामुळे त्या संदर्भात शासनाने सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र च्या विदर्भ प्रांताच्या वतीने गठित केलेल्या एका सत्यशोधन समितीने आपल्या अहवालात व्यक्त केले आहे. हा अहवाल आज नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र च्या विदर्भ प्रांताचे अध्यक्ष अविनाश पाठक आणि सचिव पराग जोशी यांनी माध्यमांना उपलब्ध करून दिला आहे. हे प्रकरण संघटित गुन्हेगारीचे देखील असल्याचे नमूद करत त्या परिसरात घडणाऱ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातही घडणाऱ्या इतर घटना लक्षात घेता या प्रकरणातही काही धर्मांतरणाचे प्रकार असू शकतात अशी शंका घेता येऊ शकते, असे नमूद करत या अहवालात या प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी असे देखील म्हटले आहे. परतवाडा येथे कथित सेक्स स्कँडल उघडकीस आल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स महाराष्ट्र च्या विदर्भ प्रांत कार्यकारिणी ने एक सत्यशोधन समिती गठीत करून या प्रकरणात नेमके सत्य काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ पत्रकार उदय अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या या  सत्यशोधन समितीत ज्येष्ठ पत्रकार मनोज जोशी, कार्तिक लोखंडे स्नेहल जोशी, (सर्व नागपूर) ज्येष्ठ पत्रकार एस जयंतकुमार, राजकीय विश्लेषक आणि संशोधक श्रेयस पन्नासे (सर्व अमरावती) अशोक पिंजरकर पत्रकार( अंजनगाव सुर्जी) संजय जोशी आणि प्रवीण तायडे (पत्रकार, परतवाडा) नितीन चौधरी (अधिवक्ता, परतवाडा) यांचा समावेश होता. या समितीने परतवाडा येथे भेट देऊन सर्व संबंधितांशी चर्चा केली. नंतरही विविध स्त्रोतातून संबंधित माहिती गोळा केली आणि त्या आधारे आपला अहवाल सादर केला आहे. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र च्विदर्भ प्रांतचे उपाध्यक्ष आणि दैनिक लोकंवाहिनीचे कार्यकारी संपादक चारुदत्त कहू यांचे या संदर्भात मार्गदर्शन लाभले आहे. आपल्या या अभ्यासपूर्ण अहवालात समितीने या प्रकरणातील पिडीतांच्या संख्येबाबत मतभेद असल्याचेही नमूद केले असून पोलिसांचे वर्तनही संशयास्पद असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या संदर्भात पीडिता बदनामीच्या भीतीने पुढे येत नसल्यामुळे चौकशी करणे अडचणीचे ठरत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पीडित मुली पोलिसांना घाबरत असून पोलिसांशी बोलण्यात त्यांना संकोचही वाटतो असेही या अहवालात म्हटले आहे. यातील एक आरोपी आयान मोहम्मद आणि दुसरा आरोपी उझेर यांच्यातील तीव्र स्पर्धेमुळे हे प्रकरण उघडकीस आले असून आयान हा मुलींचा विश्वास संपादन करून अश्लील व्हिडिओ काढत असे तर उजेर ते प्रसारित करत असे ही म्हटले आहे. यातील आयानचा ए आय एम आय एम या मुस्लिम संघटनेशीही संबंध असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात लव्ह जिहाद बाबत ठोस पुरावे समोर येत असून हिंदू सुरक्षा सेवा संघ आणि तत्सम संघटनांनी हे पुरावे समोर आणले असल्याचे सांगण्यात आले आहे. या पुराव्यातील सत्यासत्यता तपासणे देखील आवश्यक असल्याचे समितीचे मत आहे. यात अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने रोझे ठेवण्यात सांगितले जात होते असेही नमूद करण्यात आले आहे. समितीने त्या परिसरातील संबंधित पोलीस अधिकारी, तसेच पालकमंत्री, इतर लोकप्रतिनिधी यांच्याशीही संपर्क साधला आणि इतर विविध संघटनांचीही निवेदने अभ्यासली. त्या पार्श्वभूमीवर आयान हे एक केवळ प्यादे असून यामागे अजूनही काही लोक असू शकतात अशीही शंका समितीने व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल न्यायिक चौकशी व्हावी आणि अशा प्रकारांना कायम पायबंद बसावा अशी मागणी अहवालात करण्यात आली आहे. यात धर्मांतरण विरोधी कायद्यात लव्ह जिहादचा समावेश व्हावा, तसेच आंतरधर्मीय विवाहाचे निकष बदलले जावे, अशा विवाहामध्ये वधू-वरांकडून हमीपत्र घेणे अनिवार्य करावे, त्याचबरोबर अशा प्रकारात काम करणाऱ्या बनावट सामाजिक संस्थांवर करडी नजर ठेवली जावी, गावातील शाळांमध्ये स्त्रीरोगतज्ञांनी नियमित भेट द्यावी इत्यादी सूचना करण्यात आल्या आहेत. या अहवालाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अमरावतीचे पालकमंत्री तसेच या भागाचे सर्व संबंधित अधिकारी, आणि सर्व लोकप्रतिनिधींना दिल्या जाणार असल्याचेही नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र च्या विदर्भ प्रांत चे अध्यक्ष अविनाश पाठक आणि सचिव पराग जोशी यांनी सांगितले. 000000000

डहाणूतील ‘लव जिहाद’ प्रकरणाची विशेष तपास पथक मार्फत चौकशी

 पोलिस अधीक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पथक आमदार चित्रा वाघ यांनी वेधले होते लक्ष योगेश चांदेकर पालघरः डहाणू तालुक्यातील एका २२ वर्षीय तरुणीवर तसेच तिच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचे गांभीर्य भाजप महिला आघाडीच्या नेत्या, चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणले. ‘लव जिहाद’ तसेच आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा संशय त्यांनी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पोलिस महासंचालकांना या गंभीर विषयात लक्ष घालण्याचे निर्देश दिले. पोलिस अधीधक दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमून या प्रकरणाची चौकशी करावी, असे मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांना दिलेल्या निर्देशात म्हटले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, की डहाणू येथील एका बावीस वर्षीय तरुणाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या संबंधाचे व्हिडीओ चित्रण करून नंतर त्याचा गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. या तरुणीची सखी बहीण अल्पवयीन असून तिच्यावरही अशाच प्रकारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला, तरी अद्याप संशयित आरोपी फरार आहे. पोलिस ठाण्यात भेट देऊन निर्देश या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आमदार आणि भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी डहाणू तालुक्यात येऊन पोलिसांची भेट घेतली होती. त्यांच्या समवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष भारत राजपूत उपस्थित होते. या प्रकरणी आ. वाघ यांनी पोलिसांनाही चौकशीबाबत काही निर्देश दिल्यानंतर दरम्यान याच गंभीर प्रकरणी त्यांनी तातडीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात डहाणूतील सख्या बहिणीवर झालेला लैंगिक अत्याचार हा ‘लव जिहाद’चा प्रकार असल्याचे नमूद केले आहे. एका विशिष्ट समुदायाच्या मुली टार्गेट एका विशिष्ट समुदायातील सुशिक्षित मुलींना टार्गेट करण्याचा हा पूर्वनियोजित कट असू पीडित मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. त्यांची फसवणूक करून त्यांचे स्वतंत्र अस्तित्व हिरावून घेतले जात आहे. त्यांना ‘स्टुडन्ट व्हिसा’च्या नावाखाली थेट लंडन येथे पाठवले जात असल्याची गंभीर तक्रार आ. वाघ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ज्या आरोपी तरुणाकडे स्वतःच्या उदरनिर्वाहाची साधने नाहीत, असे तरुण आंतरराष्ट्रीय व्हिसा मिळवण्यासाठी आणि या गुन्हेगारी नेटवर्कसाठी लाखो रुपये कुठून आणतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणामागे मोठे आर्थिक पाठबळ असून त्यामागे कोणते आंतरराष्ट्रीय टोळी किंवा नेटवर्क कार्यरत आहे का याची चौकशी करावी अशी मागणी आ. वाघ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती. सर्व पैलूंची होणार चौकशी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले  असून पोलिस अधीक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पोलिस पथक स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकारातील सर्व पैलूंसह संभाव्य आंतरराष्ट्रीय दुव्यांची कसून चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आता गांभीर्याने लक्ष घातल्याने डहाणूतील अन्य प्रकार तसेच उर्दूत दिलेले पत्र आणि पाण्यामधून दिल्या जात असलेल्या गुंगीच्या औषध प्रकरणाची ही आता चौकशी होणार असून यात काही आंतरराष्ट्रीय टोळ्या, ‘लव्ह जिहाद’ प्रकरण आणि धर्मांतराशी संबंधित आहे, का याचीही चौकशी केली जाणार असल्याचे समजते. 0000

 टिटवाळ्यात सफाई कर्मचाऱ्यांकडून गटारात उतरून सफाई

सुरक्षेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह कल्याण: टिटवाळा येथील दळवीवाडाजवळील अमृतसिद्धी रोड आणि सुमुख सोसायटी परिसरातील रस्त्यावरील क्रॉस गटाराची सफाई करताना सफाई कर्मचाऱ्यांना थेट गटारात उतरून मैला काढावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जोशी यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही कर्मचाऱ्यांना स्वतः गटारात उतरून सफाई करावी लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हाताने मैला काढणे आणि नाल्यांची सफाई करणे यावर कायद्याने बंदी असतानाही अशा घटना घडत असल्याने संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जोशी यांनी हा व्हिडिओ संबंधित प्रशासन आणि महापालिका आयुक्तांकडे पाठविणार असल्याचे सांगितले असून, भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यांत्रिक पद्धतीने गटार सफाई, आवश्यक सुरक्षा साधने आणि नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 0000000000

नाशिकला वादळी पावसाचा तडाखा

५ तालुक्यांमध्ये वीज यंत्रणा कोलमडली हरिभाऊ लाखे नाशिक : राज्यात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू असतानाच, नाशिकच्या ग्रामीण भागाला मान्सूनपूर्व वादळी पावसाने झोडपून काढले आहे. ३, ५ आणि ६ जून रोजी आलेल्या या वादळी पावसाने जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेची अक्षरशः दैना उडवली आहे. वादळाचा सर्वाधिक फटका इगतपुरी, दिंडोरी, ओझर, सिन्नर आणि पेठ या पाच उपविभागांना बसला असून, यामुळे तब्बल चार हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व नुकसान झाले असून, यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात महावितरणच्या नाशिक ग्रामीण विभागाकडून माहिती देण्यात आली. वाद‌ळ आणि मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसरात शेकडो वीज खांब उन्मळून पडले असून, अनेक किलोमीटर लांबीच्या ओव्हरहेड वीज वाहिन्या तुटल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, १५४ उच्च दाब खांब आणि ३२० लघु दाब खांब जमीनदोस्त झाले आहेत. या शिवाय, २४ किलोमीटर लांबीच्या उच्च दाबाच्या आणि ५५.५ किलोमीटरच्या लघु दाबाच्या ओव्हरहेड वाहिन्या तुटल्या आहेत. या वादळामुळे ९ वितरण रोहित्र केंद्रे पूर्णपणे कोसळली असून तीन मोठ्या उपकेंद्रांमधील उपकरणांचे गंभीर नुकसान झाले आहे, ज्यामुळे प्रादेशिक वितरण नेटवर्क पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले. अनेक भागातील घरगुती आणि निवासी भागातील वीज पुरवठा यशस्वीरित्या पूर्ववत करण्यात आला असून, कोणतीही गावे आता अंधारात नसल्याचा दावाही केला जात आहे. सध्या केवळ शेती पंपांचा प्रलंबित वीज पुरवठा खंडित असून, तो देखील टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. सिन्नरला सर्वाधिक फटका या आपत्तीचा सर्वाधिक फटका सिन्नर तालुक्याला बसला, जेथे तीन हजारांहून अधिक ग्राहकांना सलग दोन दिवस १४ तासांपेक्षा अधिक काळ विजेविना काढावा लागला. दुसरीकडे, पेठ उपविभागात उच्च दाबाच्या पायाभूत सुविधांचे सर्वाधिक नुकसान झाले असून ४६ उच्च दाबाचे खांब कोसळले आहेत, तर दिंडोरीमध्ये घरगुती वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसून ९३ लघु दाबाचे खांब कोसळले. वीज पुरवठा सुरळीत कधी होणार ? महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर आणि दिंडोरीमधील वीज पुरवठा येत्या एक-दोन दिवसांत पूर्णपणे सुरळीत होईल. मात्र, पेठ तालुक्यातील दुरुस्तीच्या कामात मोठे भौगोलिक अडथळे येत आहेत. येथील वीज यंत्रणा दुर्गम आणि डोंगरी भागात विखुरलेली असल्याने तेथे दुरुस्ती साहित्य वाहून नेणे आव्हानात्मक ठरत आहे, परिणामी तेथील काम पूर्ण होण्यास अधिक काळ लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार सुभाष भोईर यांच्या घरी दिली सदिच्छा भेट

कल्याण :     श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ डोंबिवली आयोजित कृतज्ञता सोहळा व जाहीर सत्कार कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवली येथे आले असताना त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांसोबत माजी आमदार…

 उपाशीपोटी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना २०० कोटीचा निधी

 केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन रमेश औताडे मुंबई : पोटभर अन्न आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या दोन मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तरच देशाचे भविष्य घडते. याच विचारातून मलाबार ग्रुपने राबविलेल्या “ हंगर फ्री वर्ल्ड “ उपक्रमाला मुंबईतील कांदिवली पूर्व येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्रात नवी दिशा मिळाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सन २०२६-२७ साठी तब्बल २०० कोटी रुपयांच्या सीएसआर निधीची घोषणा करण्यात आली आहे आजही अनेक विद्यार्थी आणि युवक उपाशीपोटी शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रम त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे. भारतासह विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये हा उपक्रम दररोज एक लाखाहून अधिक गरजू लोकांपर्यंत जेवण पोहोचवत आहे. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, “युवकांना सक्षम बनविण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र शिक्षण आणि कौशल्य विकासाचा पाया हा पोषणावर आधारित असतो. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तर ते शिक्षण आणि स्वतःच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात.” मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांनीही पोषण आणि शिक्षण यांच्यातील अतूट नात्यावर भर दिला. “भूक आणि शिक्षण एकत्र नांदू शकत नाहीत. दर्जेदार शिक्षणासाठी पुरेसे पोषण आवश्यक आहे. ‘हंगर फ्री वर्ल्ड’च्या माध्यमातून आम्ही ही मूलभूत गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत,” असे त्यांनी सांगितले. अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र हे युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारे केंद्र ठरत आहे. येथे व्यावसायिक प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, करिअर मार्गदर्शन आणि रोजगार सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे युवकांची रोजगारक्षमता वाढून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्यास मदत होत आहे. भूकमुक्त समाज आणि कौशल्यसंपन्न भारत या दुहेरी उद्दिष्टांकडे वाटचाल करणारा हा उपक्रम केवळ अन्नदानाचा कार्यक्रम नसून हजारो युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेला आशेचा सेतू असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

१० वी, १२ वीच्या पुरवणी परीक्षांसाठी कोकण मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सेवा सुरू

– सचिव पुनिता गुरव यांचे आवाहन रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाकडून जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षा काळात विद्यार्थी व पालकांच्या मनातील ताणतणाव, शंका आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी मंडळाने विशेष हेल्पलाईन आणि समुपदेशन (काउन्सिलिंग) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी केले आहे.परीक्षांचे वेळापत्रकइयत्ता १२ वी (एचएससी) परीक्षा: १६ जून ते ८ जुलै २०२६इयत्ता १० वी (SSC) परीक्षा: १६ जून ते ३० जून २०२६समुपदेशन सेवा (८ जूनपासून सुरू)विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटू नये किंवा इतर मानसिक अडचणी येऊ नयेत यासाठी ८ जूनपासून परीक्षा संपेपर्यंत समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. खालील समुपदेशकांशी पालक व विद्यार्थी संपर्क साधू शकतात: संदिप दत्ताराम शिर्के : ९५५२०६४६४० भाग्यविधाता भास्कर वारंग : ९४२३२१३२४०शंका निरसनासाठी मंडळाचे अधिकारी व संपर्क क्रमांकविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व तांत्रिक शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळाने खालील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे: अधिकारी / कर्मचारी यांचे नावपद / विभागमोबाईल क्रमांक पुनिता गुरव विभागीय सचिव ९०११२६२८४० प्रेरणा शिंदे विभागीय सहाय्यक सचिव ९६७३०८००७७ अनिल पवार पर्यवेक्षक लिपिक (इ. १२ वी)९६७३MT१२६७ (९६७३१२१२६७) राजेंद्र यादगिरे पर्यवेक्षक लिपिक (इ. १० वी)९४२०५१८२१३ गजानन जाधव लेखा व भांडार शाखा८०८७७४६१२२ विशेष हेल्पलाईन क्रमांक: विद्यार्थी आणि पालकांसाठी ०२३५२ २३१२५० हा मुख्य हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध असून, यावर सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत संपर्क साधता येईल.

 सत्य विजया एससीची विजयी सलामी

सबर्बन प्रीमियर फुटबॉल लीग २०१६ मुंबई : ॲथलेटिक्स असोसिएशनने आयोजित सबर्बन प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये (२०३६) पहिल्या फेरीच्या सामन्यात सत्य विजया एससीने आय.सी. स्पोर्टिंगचा ४-० असा धुव्वा उडवला.  बोरिवली येथील सेंट फ्रान्सिस…