Month: July 2026

 मध्य रेल्वे व कोकण रेल्वे प्रशासनाकडून ‘गणेशोत्सव विशेष गाड्यां’ची घोषणा

अनिल ठाणेकर ठाणे, आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर, सोयीचा आणि सुरक्षित व्हावा, यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश गणपत म्हस्के यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. या विशेष प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या (TOD Special Trains) चालवण्याचा निर्णय घेण्यासोबतच सावंतवाडी रोड (SWV) स्थानकावर ३ प्रमुख लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर नियमित थांबा (Experimental Stoppage) मंजूर केला आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कोकणातील प्रवाशांची, पर्यटकांची आणि चाकरमान्यांची गर्दी व होणारी गैरसोय लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्यांण यांची भेट घेऊन विशेष गाड्यांची मागणी केली होती. १. सावंतवाडी रोड (SWV) स्थानकावर नियमित मंजूर झालेले नवीन थांबे, कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे जारी केलेल्या सूचनेनुसार सावंतवाडी स्थानकावर खालील गाड्यांना थांबा मंजूर झाला आहे. (KR/CO/O/NOTI/२०२6-२७  date – २4 July २०२6): CSMT – मंगळुरू – CSMT एक्स्प्रेस  (Daily): गाडी क्र. १२१३३ (CSMT ते MAJN): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — सकाळी ०७:०२ / ०७:०४ (दिनांक २६ जुलै २०२६ पासून लागू). गाडी क्र. १२१३४ (MAJN ते CSMT): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — रात्री २३:३० / २३:३२ (दिनांक २७ जुलै २०२६ पासून लागू). हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम ‘राजधानी’ एक्स्प्रेस (Tri-Weekly): गाडी क्र. १२४३२ (NZM ते TVC): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — सकाळी ०६:१८ / ०६:२० (दिनांक २६ जुलै २०२६ पासून लागू). गाडी क्र. १२४३१ (TVC ते NZM): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — सकाळी ०९:४४ / ०९:४६ (दिनांक २८ जुलै २०२६ पासून लागू).लोकमान्य टिळक टर्मिनस – त्रिवेंद्रम ‘गरीब रथ’ एक्स्प्रेस (Bi-Weekly): गाडी क्र. १२२०१ (LTT ते TVCN): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — पहाटे ०२:०२ / ०२:०४ (दिनांक २७ जुलै २०२६ पासून लागू). गाडी क्र. १२२०२ (TVCN ते LTT): सावंतवाडी आगमन/प्रस्थान — पहाटे ०३:२८ / ०३:३० (दिनांक ३० जुलै २०२६ पासून लागू).२. गणेशोत्सव २०२६ विशेष गाड्यांचे वेळापत्रक:मध्य रेल्वेने ११ सप्टेंबर २०२६ पासून खालील विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे (Railway Letter No.T.3२२/X-१२/Ganpati Specials/२०२6 date – २4 July २०२6):CSMT – सावंतवाडी – CSMT (दैनिक स्पेशल). ट्रेन क्रमांक: ०११०3 / ०११०4.फेऱ्या व कालावधी: ११ ते २७ सप्टेंबर २०२६ (एकूण १६ फेऱ्या). वेळ: CSMT वरून निघणार: १५:३० | सावंतवाडी आगमन: ०४:०० (दुसऱ्या दिवशी).प्रमुख थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ.LTT – सावंतवाडी – LTT (दैनिक स्पेशल).ट्रेन क्रमांक: ०११७१ / ०११७२. फेऱ्या व कालावधी: ११ ते २८ सप्टेंबर २०२६ (एकूण १७ फेऱ्या).वेळ:…

 वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात नगरसेवक राहुल कोट आक्रमक

 महावितरण अधिकार्यांना दिले निवेदन कल्याण : कल्याण नजीक मोहनेसह आजूबाजूच्या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक राहुल कोट यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. परिसरातील वीज वाहिन्यांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांना वारंवारच्या वीज समस्येतून दिलासा मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रभाग क्र. ०४ अंतर्गत मोहने, शनिवार पाटील नगर, यादवनगर, जेतवननगर, फुलेनगर, गाळेगाव, शिवसृष्टी तसेच आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना प्रचंड सनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसातून अनेक वेळा रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्याच्या काळात ही समस्या अधिक गंभीर होत असून, मुख्य वीजवाहिन्या, जंपर, इन्सुलेटर तसेच इतर विद्युत यंत्रणांची वेळेवर तपासणी व प्रतिबंधात्मक देखभाल होत नसल्यामुळे वारंवार बिघाड होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पुढील आठवड्यात हवामान अनुकूल होताच दोन स्वतंत्र तांत्रिक पथके नियुक्त करून पॉवर हाऊस ते मोहने, आर. ‘स. गाळेगाव तसेच शिवसृष्टी ते आंबिवली रेल्वे स्टेशनपर्यंत संपूर्ण मुख्य वीज वाहिन्यांचे पेट्रोलिंग, जंपर तपासणी, नाडांच्या फांद्या छाटणे, सैल जोडण्या दुरुस्त करणे व आवश्यक ती प्रतिबंधात्मक देखभाल तातडीने करण्यात यावी. हे काम तातडीने पूर्ण करून वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यावा. अन्यथा नागरिकांच्या वाढत्या संतापाची व गैरसोयीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील असा इशारा नगरसेवक राहुल कोट यांनी दिला आहे. ००००

चेंबूर जिमखाना कॅरम –  राहुल सोलंकी उपांत्य फेरीत दाखल

मंुबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने चेंबूर जिमखाना येथे सुरु असलेल्या चेंबूर जिमखाना ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या उप उपांत्य फेरीत मुंबईच्या राहुल…

 मनसेकडून १,००० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

 अमित ठाकरे यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ मुंबई, दि. २6 जुलै -महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक ११७ आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, विक्रोळी विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने विभागातील सुमारे १,००० शालेय…

– रौप्यमहोत्सवी ‘खजाना – द फेस्टिव्हल ऑफ गझल्स’चा सुरेल शुभारंभ

 पंकज उधास यांच्या संगीतसेवेचा आणि समाजकार्यातील वारशाचा जागर मुंबई : पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित दिवंगत गझल सम्राट पंकज उधास, ज्येष्ठ गायक अनुप जलोटा आणि तलत अजीज यांच्या संकल्पनेतून २००१ साली सुरू झालेल्या ‘खजाना – द फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ या प्रतिष्ठित महोत्सवाने यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात दिमाखदार प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील हॉटेल ट्रायडंटच्या ‘द रीगल रूम’मध्ये शुक्रवारी या दोन दिवसीय महोत्सवाचा सुरेल शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. रौप्यमहोत्सवी पर्वानिमित्त दिवंगत गझल सम्राट पंकज उधास यांच्या समृद्ध संगीतवारशाला तसेच गेल्या २५ वर्षांत ‘खजाना’ला समृद्ध करणाऱ्या दिग्गज कलाकारांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. संगीत, संवेदना आणि समाजसेवा यांचा सुरेल संगम अनुभवण्यासाठी देशभरातील गझलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन समारंभाला ज्येष्ठ गझल गायक अनुप जलोटा, हरिहरन, रेखा भारद्वाज, मिताली सिंह, पेनाझ मसानी, सुदीप बॅनर्जी, पॅरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (PATUT)च्या फरीदा पंकज उधास तसेच कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA)चे वाय. के. सप्रू यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रौप्यमहोत्सवी ‘खजाना’च्या दोन दिवसांच्या सांगीतिक पर्वात अनुप जलोटा, हरिहरन, सोनू निगम, रेखा भारद्वाज, विशाल भारद्वाज, जावेद अली, सुदीप बॅनर्जी, सुनील मुंगे, अलेना भारती, निहिरा जोशी आणि तेजस गंभीर या नामवंत कलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गझल, सूफी आणि भावसंगीताच्या सुरावटींनी सजलेल्या या मैफलींमधून प्रत्येक कलाकाराने दिवंगत पंकज उधास यांच्या संगीतवारशाला भावपूर्ण अभिवादन केले. यावेळी फरीदा पंकज उधास म्हणाल्या, “’खजाना’ हा पंकजजींसाठी केवळ संगीत महोत्सव नव्हता, तर तो आशा, संवेदना आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा प्रवास होता. ते आज आपल्यात नसले तरी त्यांची प्रेरणा प्रत्येक सुरातून आजही जिवंत आहे. कलाकार, रसिक आणि समाजाने दिलेल्या प्रेमामुळेच ‘खजाना’चा हा प्रवास आज २५ वर्षांपर्यंत यशस्वीपणे पोहोचला आहे.” दिवंगत पंकज उधास यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाने गेली २५ वर्षे थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी कार्यरत पॅरेंट्स असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (PATUT) आणि कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचार व मदतीसाठी कार्यरत कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) यांच्यासाठी निधी संकलनाची परंपरा अखंडपणे जपली आहे. संगीताच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देणारा ‘खजाना’ आजही ही परंपरा तितक्याच प्रभावीपणे पुढे नेत आहे. दोन दिवस चाललेल्या या रौप्यमहोत्सवी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुरेल सादरीकरणासह समाजसेवेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवत ‘खजाना – द फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ने आपल्या २५ वर्षांच्या समृद्ध प्रवासाला संस्मरणीय स्वरूपात उजाळा दिला.

 आषाढी एकादशी निमित्त दिव्यात रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्यावतीने रक्तदान शिबिर

 ४६ बाटल्या रक्त संकलित दिवा : आषाढी एकादशीच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या वतीने दिवा पूर्व येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी नगर, दातिवली रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ४६ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत उत्साहाने सहभाग नोंदवला. तसेच आयोजकांच्या वतीने पहिल्या १०० रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेचे अध्यक्ष गणेश तावरे, सचिव अंकुर मुंडे, तसेच प्रकल्प प्रमुख नंदकुमार किणे आणि  विकास गुंजाळ (सी.ए) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यावेळी साईनाथ म्हात्रे, स्वप्नील गायकर, महेंद्र दळवी, आदित्य पाटील, किशोर पाटील, प्रतीक बेडेकर, डॉ. पराग जोशी हे मान्यवर उपस्थित होते.  आषाढी एकादशीच्या दिवशी रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याचे आयोजन करून रोटरी क्लबने समाजासमोर सेवा आणि मानवतेचा आदर्श ठेवला. उपस्थितांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

 ७० वर्षांचा महिंद्रा कारखाना, २० वर्षे युनियन निवडणूक नाही;

कांदिवलीतील कामगार आक्रमक, सरकारी अधिकाऱ्यावर पक्षपाताचे गंभीर आरोप मुंबई : कांदिवली येथील महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (ऑटोमोटिव्ह सेक्टर) या गेल्या ७० वर्षांपासून कार्यरत असलेल्या कारखान्यात कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, कामगार युनियनची निवडणूक घेण्याचे न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही संबंधित सरकारी अधिकारी कंपनी व्यवस्थापन आणि विद्यमान कामगार नेतृत्वाला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर मराठी कामगार कार्यरत आहेत. कामगारांच्या म्हणण्यानुसार, सध्याचे युनियन पदाधिकारी आणि एक कामगार नेता गेल्या २० वर्षांहून अधिक काळ कोणतीही निवडणूक न घेता पदावर कायम आहेत. कंपनी व्यवस्थापन आणि विद्यमान युनियनच्या संगनमतामुळे कामगारांचे सातत्याने शोषण होत असल्याचा आरोप संतप्त कामगारांनी केला आहे. या विरोधात कामगारांनी औद्योगिक न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा दिला. या लढ्याला यश मिळाल्यानंतर न्यायालयाने युनियनची नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले. या निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी उपनिबंधक, श्रमिक संघ, कोकण विभाग या पदावरील सरकारी अधिकारी अतुल सावरकर यांच्याकडे सोपविण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्याऐवजी अतुल सावरकर हे कंपनी व्यवस्थापन आणि विद्यमान नेतृत्वाला अनुकूल ठरतील अशा पद्धतीने काम करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. तसेच, कंपनीतील अधिकाऱ्यांशी त्यांचे खासगी संबंध असल्याचा आणि त्यांच्यासोबत विविध ठिकाणी वेळ घालवल्याचे कथित व्हिडिओ कामगारांपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांच्या वर्तनाबाबत कामगारांनी तीव्र नाराजी आणि निषेध व्यक्त केला आहे. या सर्व प्रकारांमुळे कामगारांमध्ये भीती, संभ्रम आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी कामगारांनी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना लेखी निवेदन दिले असून, महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड यांचीही वारंवार भेट घेऊन तक्रारी सादर केल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्याच्या कथित चुकीच्या धोरणांमुळे अनेक कामगारांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती कामगारांनी व्यक्त केली आहे. मात्र, सरकारी यंत्रणा या प्रकरणात चालढकल करत संबंधित अधिकाऱ्याला संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, येत्या काही दिवसांत मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू असल्याचे कामगारांनी सांगितले आहे. महिंद्रासारख्या प्रतिष्ठित औद्योगिक संस्थेमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीचा कंपनीच्या प्रतिमेवर तसेच महाराष्ट्राच्या औद्योगिक वातावरणावर परिणाम होणार नाही का, असा प्रश्नही कामगारांनी उपस्थित केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार युनियनची निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने झाली नाही, तर कामगार रस्त्यावर उतरून कंपनी व्यवस्थापन आणि कामगार विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही कामगारांनी दिला आहे. सोबत जोडलेले दस्तऐवज : १. अतुल सावरकर यांच्या वर्तनाची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कामगार विभागाचे पत्र. २. अतुल सावरकर यांच्या विरोधात कामगारांनी केलेल्या तक्रारीची प्रत. – सुहास गोरे आणि इतर कामगार

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे लोकशाहीचा विजय- नारायण बागडे

रमेश औताडे मुंबई : लोकशाहीमध्ये आंदोलन लहान असो वा मोठे, त्याचे महत्त्व कमी होत नाही. लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज बुलंद करणे हेच खऱ्या लोकशाहीचे बळ आहे. आंदोलन करणारा नेता असो किंवा सामान्य नागरिक, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आंदोलन हेच लोकशाहीतील सर्वात प्रभावी हत्यार असल्याचे मत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्च चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी व्यक्त केले. अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी अभिनंदन मार्च लवकरच काढण्यात येणार आहे असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे संभाजीनगर अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांनी जाहीर केले. मराठवाडा प्रदेश अध्यक्ष बापु सय्यद सलीम, सुनीता धाबडे, प्रा.रमेश दुपारे, यांनी नवयुवकांचे अभिनंदन केले. लोकशाही व्यवस्थेत जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे आणि शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन नेहमीच परिणामकारक ठरते. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचेही बागडे यांनी यावेळी सांगितले. 0000

 डोंबिवलीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात

 तब्बल १८५१ नागरिकांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ ठाणे : अशोक गायकवाड राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाच्या धोरणानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.२५ जुलै २०२६ रोजी डोंबिवली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली पूर्व येथील ब्राह्मण सभा हॉल येथे सकाळी १० वाजेपासून आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात तब्बल १ हजार ८५१ लाभार्थ्यांनी विविध शासकीय दाखले व योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतला.आमदार १४३ डोंबिवली विधानसभा मतदारसंघ तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र दत्तात्रय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. कल्याण उपविभागीय अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत सहजतेने पोहोचावा, या मुख्य उद्देशाने आयोजित या शिबिरात दिवसभरात विविध सेवांचे जलद गतीने वाटप करण्यात आले. यामध्ये शैक्षणिक व प्रशासकीय कामांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या इतर विविध प्रमाणपत्रांचा ४१७ नागरिकांनी लाभ घेतला. तर राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणानुसार ३१६ महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे, २०८ नागरिकांना डिजिटल ७/१२ उतारे, १७७ जणांना आयुष्मान भारत कार्ड, १४५ जणांना उत्पन्न प्रमाणपत्र, १२८ जणांना अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल), १०७ जणांना जातीचे प्रमाणपत्र, ८२ ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आणि ७४ जणांना रहिवासी दाखले प्रदान करण्यात आले. याशिवाय ५६ जणांना नॉन-क्रिमीलेअर दाखले, ४४ नागरिकांना आधार नोंदणी व दुरुस्ती सुविधा, २७ जणांना नवीन शिधापत्रिका (राशन कार्ड) आणि १७ जणांना गावठाणातील स्वामीत्व योजनेअंतर्गत सनद वाटप करण्यात आले.सामाजिक कल्याण व निवृत्तीवेतन योजनांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १७, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे ७ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे ५ लाभार्थी लाभान्वित झाले. पारंपारिक व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कुंभार समाजातील १५ व्यक्तींना व्यावसायिक सवलतीचे दाखले वाटप करण्यात आले. तसेच ६ जणांना जिवंत सातबारा मोहिमेचा लाभ मिळाला, तर ३ प्रकरणात कमी-जास्त पत्रके तयार करून नोंदी अद्ययावत करण्यात आल्या.नागरिकांना एकाच छताखाली आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने सर्व शासकीय सेवा व दाखले उपलब्ध करून देण्यात आले. महसूल विभागाच्या या धोरणात्मक सुधारणांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे विशेष समाधान शिबिर अत्यंत प्रभावी ठरली आहे. 0000

 दिव्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व योग शिबिर

 ६५ लाभार्थ्यांनी घेतला लाभ दिवा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, ठाणे आणि श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेअंतर्गत दिव्यातील विठ्ठल- रुक्मिणी नगर येथे आषाढी एकादशी निमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी योगा, मानसिक आरोग्य व जीवनशैली मार्गदर्शन तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (शुगर), ईसीजी (ECG), डोळे, नाक, कान व घसा तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक रक्त तपासणीही करण्यात आली. या आरोग्य शिबिराचा सुमारे ६५ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी ज्येष्ठ नागरिकांना नियमित व्यायाम, योगाभ्यास, मानसिक आरोग्याची काळजी, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांनी अशा उपक्रमांचे स्वागत करत भविष्यातही अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत सपकाळ तसेच श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळाचे सचिव योगेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच डॉ. आकाश हावळे, सिसटर शोभा मोरे, मनिषा निकम, वैभव पाखड, सोनिया चव्हाण, सलोनी गाडे, मंजू जगताप, लिलाधर जाधव हा स्टाफ तेव्हा उपस्थित होता. 0000