कल्याण : महावितरण कडून वारंवार आवाहन करूनही चुकीच्या मार्गाने वीज वापरणाऱ्या मांडा, टिटवाळा परिसरातील २० वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरण कडून रितसर मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मांडा, टिटवाळा परिसरात वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी सहायक अभियंता तुकाराम घोडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासणी केली. तपासणी दरम्यान बहुतांश वीज ग्राहक चोरी करुन वीज वापर करीत असल्याचे आढळून आले. महावितरण कडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत पांडुरंग अंगम, प्रविण जा़धव, अमीना बी अख्तर, आरती शर्मा, रेणू शुक्ला, मोहम्मद मलिक अजगर अली, राबिया अन्सारी, रोषन कलसुकर, सुमित्रा भगत, मोहम्मद अयुब, अल्फिया डेव्हलपर, ए.एस.बाबा इलेक्ट्रिकल, जगदीश धुमाळ, सुनील शिंदे, विनायक पाटील, सुनील खरात, जयश्री जाधव, किशोर राठोड, आकाश पाल या वीज ग्राहकांनी महावितरणची ८७८३ युनिटची वीज चोरून वापरली अशी फिर्याद महावितरण कडून देण्यात आली आहे. मुरबाड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *