डोंबिवलीतील निकृष्ट डांबरीकरणाचा सत्यवान म्हात्रेंनी केला पर्दाफाश
कल्याण : डोंबिवली शहरातील रस्त्यांवर करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाच्या दर्जावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रस्त्याचे डांबरीकरण होऊन अवघे दोन दिवस झाले असतानाच डांबर उखडून रस्त्यावर खडी पसरल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांनी उघडकीस आणला आहे. डांबर उखडल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरली असून, वाहनचालकांना त्यावरून वाहने चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही खडी धोकादायक ठरू शकते. अचानक वाहन घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी मोठा खर्च केला जात असताना अवघ्या दोन दिवसांत डांबर उखडत असेल, तर कामाच्या दर्जाची तपासणी नेमकी कशी केली जाते, असा सवाल सत्यवान म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने या कामाची पाहणी करून निकृष्ट कामाबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली. अशी टीका करत सत्यवान म्हात्रे यांनी डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या पैशातून होणारी विकासकामे टिकाऊ आणि दर्जेदार असावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *