Month: September 2026

विविध मागण्यांसाठी उमेद कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन कामबंद आंदोलन

  अनिल ठाणेकर ठाणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अभियानांतर्गत सन २०१८ पासून ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑनलाइन कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या…

सरळगाव एमआयडीसी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

– दहा गावांतील सुमारे ३०० शेतकरी सभेत सहभागी; ३० सप्टेंबरला मोर्चाचा निर्णय अनिल ठाणेकर ठाणे,  सरळगाव एमआयडीसी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बाधित दहा गावांतील शेतकऱ्यांची प्राथमिक सभा रविवारी पारतळे येथे उत्साहात…

नाशिकमध्ये गणेश मंडळांचा महावितरणला दणका

‘स्मार्ट प्रीपेड मीटर घेणार नाही’, मोफत वीजपुरवठ्याची मागणी हरिभाऊ लाखे नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सवात अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणकडून केले जात असताना, नाशिकमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरद्वारे तात्पुरती वीज जोडणी…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ‘लीगल एड क्लिनिक’चे उद्घाटन

  अनिल ठाणेकर ठाणे : असंघटित क्षेत्रातील कामगार, वंचित महिला, गरजू नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देतानाच मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी REAP एज्युकेशन…

– ‘खड्डे भरण्याच्या कामाला थातुरमातुर डांबरीकरणाचा मुलामा’- मोहन उगले

आधारवाडी रोड ते वाडेघर चौक रस्त्याच्या कामावर माजी नगरसेवकांचा आरोप कल्याण : कल्याण पश्चिमेतील आधारवाडी रोड ते वाडेघर चौक या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामावरून माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मोहन…

जेएनपीटीला ‘डेडिकेटेड’ वेग, रायगडच्या विकासाला नवा ट्रॅक!

– २०,७०० कोटींच्या ३२६ किमी मालवाहतूक मार्गिकेच्या तीन टप्प्यांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण अशोक गायकवाड अलिबाग : जेएनपीटीला पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेची जोड मिळाल्याने रायगडच्या बंदर, उद्योग आणि लॉजिस्टिक्स…

वृद्ध महिलेला न्यायासाठी आंदोलनाचा इशारा

मुंबई / रमेश औताडे तुरुंगात शिक्षा भोगून आलेली व्यक्ती मला मारहाण करत असेल,  माझ्या शेतातील झाडे तोडत असेल तर पोलिस त्याला अटक का करत नाहीत ? असा सवाल करत तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील घोटवी गावच्या शोभा भाऊसाहेब खेंडकर यांनी  पोलीस अधिक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे १७ सप्टेंबर २०२६ पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात त्या व्यक्तीचे नाव जग्या गुरफ्या काले असे नमूद केले असून हा सराईत गुन्हेगार गेली अनेक वर्षे मारहाण, शिवीगाळ, धमक्या देत असल्याने त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याला दिलेली शिक्षा त्याने कारागृहात जाऊन भोगलेली आहे. माझ्यावर अन्याय होत असताना पोलीस मात्र एनसी शिवाय कोणतीही दखल घेत नाहीत. त्याच्यावर  ठोस कारवाई व गुन्हा दाखल होऊन त्यास अटक होईपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही असे निवेदन शोभा खेंडकर यांनी पोलिसांना दिले आहे. या गुंडाने माझ्या शेतातील ७० आंब्याची झाडे कापून टाकली, पोलीस व वनखात्याला लेखी कळवूनही  स्थळपाहणी, पंचनामाही करण्यात आला नाही. माझी मुले नोकरी निमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे आता मला न्याय मिळावा.

– अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एसीबीचा ‘दणका’

८ महिन्यांत ११ लाचखोर जाळ्यात! महसूल विभाग आघाडीवर; मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस उपनिरीक्षकांसह अभियंता अन् वैद्यकीय अधिकारीही कारवाईच्या कचाट्यात अशोक गायकवाड रत्नागिरी : सरकारी कार्यालयात कामासाठी गेलेल्या नागरिकाची अडवणूक करून ‘चिरीमिरी’ मागणाऱ्या लाचखोरांना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चांगलाच दणका दिला आहे. पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी ते ऑगस्ट या अवघ्या आठ महिन्यांत आठ सापळा कारवायांमध्ये एका खासगी मध्यस्थासह तब्बल ११ जणांना एसीबीच्या जाळ्यात पकडण्यात आले. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. एसीबीच्या कारवाईत महसूल विभाग सर्वाधिक रडारवर आला आहे. महसूल विभागातील पाच प्रकरणांत तीन मंडळ अधिकारी, दोन तलाठी आणि एका कोतवालासह सहा जणांवर कारवाई झाली. पोलीस प्रशासनातील एका पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसमाला, पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता व लिपिकाला, तर आरोग्य विभागातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचखोरीच्या प्रकरणात कारवाईला सामोरे जावे लागले. ‘काम करून देतो, पण आधी…’ म्हणणाऱ्यांना इशारा! कायदेशीर कामासाठी नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारायला लावून लाचेची मागणी करणाऱ्यांविरुद्ध थेट एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाच मागणे आणि लाच देणे, दोन्ही कायद्याने गुन्हे आहेत. त्यामुळे ‘काम अडेल’ या भीतीने लाच देण्याऐवजी नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन एसीबीने केले आहे. लाच मागितल्यास शक्य असल्यास ऑडिओ-व्हिडिओ पुरावा सुरक्षित ठेवून एसीबीकडे तक्रार करता येते. भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात नागरिकांचे सहकार्य निर्णायक ठरणार आहे, असे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी सांगितले. तक्रारीसाठी : १०६४ | व्हॉट्सॲप : ७०३८३९१०६४ | दूरध्वनी : ०२३५२-२२२८९३ १५ आॕगस्ट ला पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी एसीबी उपअधीक्षक अविनाश पाटील यांचा विशेष कामगिरीसाठी सत्कार करताना. 00000  

देशातील कर्करोगाच्या रुग्णसंख्येत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण लक्षणीय

  रमेश औताडे मुंबई  : देशातील कर्करोगाच्या रुग्णसंख्येत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण लक्षणीय वाढ झाली असून प्रत्येक रुग्णासाठी एकसारखी उपचार पद्धती योग्य ठरत नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढते वय, इतर आजार, शारीरिक क्षमता, मानसिक आरोग्य, पोषणाची स्थिती आणि सामाजिक आधार यांचा विचार करून उपचाराचे नियोजन करणे आवश्यक ठरते. असे मत अपोलो हॉस्पिटल चे डॉक्टर तेजंदर सिंह यांनी व्यक्त केले. वाढत्या वयाबरोबर कर्करोगाचा धोका वाढत असला तरी प्रत्येक ज्येष्ठ रुग्णाची उपचार सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. काही ज्येष्ठ व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात, तर काहींना आधीपासून मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, अशक्तपणा किंवा अन्य आजारांचा सामना करावा लागत असतो.अशा परिस्थितीत केवळ कर्करोगाचा प्रकार आणि त्याची अवस्था पाहून उपचार ठरवणे पुरेसे ठरत नाही. रुग्णाची दैनंदिन कामे करण्याची क्षमता, आहार, मानसिक स्थिती, कुटुंबाचा आधार आणि आर्थिक परिस्थिती यांचाही उपचाराच्या निर्णयात विचार होणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये कर्करोगाचे उपचार करताना ‘कमी उपचार म्हणजे चांगले उपचार’ असा सरसकट दृष्टिकोनही योग्य नाही. रुग्णाची एकूण प्रकृती आणि उपचार सहन करण्याची क्षमता लक्षात घेऊन आवश्यक ते उपचार देणे महत्त्वाचे आहे. काही रुग्णांना शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडिएशन उपचारांची गरज असू शकते; तर काही रुग्णांमध्ये उपचारांचे स्वरूप आणि तीव्रता त्यांच्या प्रकृतीनुसार बदलावी लागू शकते.

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी ‘बंडखोर’ २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

  संपदा सावंत मुंबई : अन्यायाविरोधात आवाज उठवत स्वतःच्या आयुष्याची सूत्रे हाती घेणाऱ्या सहा वेगवेगळ्या स्त्रियांच्या संघर्षाची कहाणी सांगणारा महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ हा चित्रपट २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.…