अनिल ठाणेकर
ठाणे : कोव्हीडमध्ये भरती न झाल्याने काही युवकांचे वय आता सध्याच्या पोलीस भरतीच्या निकषात बसत नाही. यामुळे राज्य सरकारने या २ लाख मुलांच्या भविष्याचा विचार करून नियमात थोडी शीतलता आणावी,अशी मागणी शुक्रवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात बोलताना केली.
राज्यात पोलीस भरती सुरू आहे.आणि या पार्श्वभूमीवर सुमारे २ लाख युवकांचे प्रतिनिधीत्व करणार एक शिष्टमंडळ मुंबई मध्ये उपोषणाला बसलेले आहे. कोव्हीडमध्ये भरती न झाल्याने काही युवकांचे वय आता सध्याच्या पोलीस भरतीच्या निकषात बसत नाही.यामुळे राज्य सरकारने या २ लाख मुलांच्या भविष्याचा विचार करून नियमात थोडी शीतलता आणावी,अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात बोलताना केली. यासोबतच, हाजीमलंग येथे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरे पाडण्यात आली आहेत.कायद्यानुसार पावसाळ्यात अशी घरे पाडता येत नाहीत.शासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी देखील मागणी आम जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी सभागृहात केली.
0000
