मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची तुफान बॅटींग

मुंबई:   क्रिकेटच्या मैदानावर सुर्यकुमार यादवने पकडलेला कॅच आणि दोन वर्षापुर्वी आम्ही ५० जणांनी राजकाराणाच्या खेळपट्टीवर काढली विकेट कधीच विसरता येणार नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आणि सभागृहात एकच हशा पिकला. निमित्त होते, महाराष्ट्राच्या विधान भवनात कर्णधार रोहित शर्मासह चार मुंबईकर खेळाडूंचा सर्व आमदारांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या गौरव सोहळ्याचा. या सोहळ्यात टी20 विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडू कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यात आला . यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान बॅटींग केली.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, 17 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आपण वर्ल्डकप जिंकला. कोणाला विश्वास बसणार नाही, पण मी अंतिम सामना पूर्ण पाहिला. भारतीय संघात मुंबईतील चार खेळाडू होते, याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हेही आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत. काल अरबी समुद्राच्या बाजुला मुंबईकरांचा महासागर उसळला होता. ते पाहून आम्हालाही धडकी भरली होती, कारण एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतील, असे कोणालाही वाटले नव्हते. पण, वाहतुकीचे नियोजन आणि सर्वकाही सुरळीत पार पाडल्याबद्दल मी मुंबईच्या पोलिसांचे अभिनंदन करतो. भारत हा क्रिकेटचा विश्वगुरु आहे आणि मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. काल क्रिकेटप्रेमी वारकरी मुंबईकडे निघाले होते, असे वर्णन मुख्यमंत्र्यांनी कालच्या गर्दीचे केले.

रोहित शर्माचं मराठीत भाषण

रोहित शर्मा याने यावेळी मुंबईकर शैलीत सर्वांना अभिवादन करत म्हटलं की, ‘सर्वांना माझा नमस्कार. येथे बोलावल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ%C