ठाणे: ठाणे महानगर पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे औषधाचा तुटवडा आहे लहान मुलाची संडास, उलटी ची औषध रुग्णालयात उपलब्ध नाही रुग्णालय प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष आहे…

सध्या वातावरणात बदल झाल्यामुळे लहान मुलांबरोबरच मोठे माणसेही या वातावरण बदलामुळे आजारी पडत आहे.आजारी रुग्णांना महानगरपालिकेच्या दवाखान्यात औषध उपलब्ध नाहीये रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता अधिकारी सांगतात की औषधाचा तुटवडा आहे तुम्ही ही औषधे बाहेरून घ्या…. सामान्य व्यक्ती ज्यांचे कडे बाहेरून औषधे घ्यायचे पैसे नाही किंव्हा काही अडचण असल्यास त्यांनी काय करावे.. जे गरीब रुग्ण आहे तेच महानगरपालिकेच्या रुग्णालयात येत असतात मात्र यांचा मनमानी कारभार चालू आहे

औषधे का उपलब्ध नाही डॉक्टर औषधे लिहून देत आहे आणि तुम्ही उपलब्ध नाही असे बोलतात जर औषधे उपलब्ध नाही याची माहिती डॉक्टरांना असायला हवी. अपघात विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर बोलतात तुम्ही जिकडे राहता तिकडे जा तिकडे हे औषध मिळतील. आणि हेच लिहून द्या महणल्यवर रुग्णालयातील अधिकारी दखल घेत नाहीये.. पोलिस किंव्हा जवानांना बोलवून ऑफिस मधून बाहेर काढत आहे त्याचबरोबर धमकी देत आहे. जवान बोलत आहे आज रविवार आहे तुम्ही का आलात यायचं नाही सोमवारी या

जर लहान मुलाची तब्येत जास्त खराब असेल आणि रुग्णालय प्रशासन व पोलिस अधिकारी व जवान असे बोलत असेल तर तर त्या Casuality विभागाची गरज काय आहे…. प्रशासनाने याची दखल घ्यायला हवी आणि रूग्णसोबत अरेरावीची आणि उद्धट भाषा करणाऱ्या जवान (अनिल पाटील) आणि कर्मचाऱ्याची हकालपट्टी करावी अशी मागणी पुढे येत आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *