अशोक गायकवाड

 

 

अलिबाग : रायगड जिल्ह्यात स्वच्छतेचे दोन रंग हिरवा ओला व निळा सुका अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. सदर अभियान ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत ५ असे ४ हजार ४५ संवादक कुटुंबांना गृहभेटी घेवून संवाद साधणार आहेत. त्यानुसार कचरा वर्गीकरण व व्यवस्थापन मध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखलें यांनी केले आहे.*
शास्वत स्वच्छतेसाठी विविध विषयांच्या अनुषंगाने गृह भेटीच्या माध्यमातून जनजागृती साठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पाच संवादक घराना भेटी देऊन ओला, सुका कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन बाबत माहिती देतील..यासाठी जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींमध्ये ४ हजार ४५ संवादक कार्यरत राहतील. संवादक म्हणून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती,,अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेवीका,गट समन्वयक, जल सूरक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. अभीयान अंतर्गत संपादकांनी गावातील सर्व कुटुंबाना‌ भेटी देऊन अभियानाची माहिती द्यायची आहे. गाव पातळीवर स्वच्छतेची लोक चळवळ उभी करण्यासाठी अभियान उपयुक्त ठरणार आहे. दर आठवड्याला राज्य स्तरावरून गृह भेटीचां आढावा घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *