रमेश औताडे
मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले व दुर्ग यांची अवस्था वाईट असताना कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील अनधिकृत पद्धतीने बांधकाम होत आहे. या विरोधात शिवप्रेमींनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंदोलन स्थळी भेट देत या प्रकरणी सरकार गंभीर दखल घेईल असे आश्वासन दिले.
विशालगडावर होत असलेल्या या अनधिकृत मशीद बांधकामा विरोधात शिवप्रेमी व काही सामान्य नागरिकांनी विविध मार्गांनी आपला विरोध दर्शवत राज्यभर निदर्शने केली व याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानावरही आंदोलन केले. “विशाळगडाचे पावित्र्य जापण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलनकर्त्यांचा आवाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर ताबडतोब घालून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतो असे आश्वासन दिले.
0000
