अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वार्थीपणामुळे उडतोय
मुंबई : महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या मुद्रांक अभय योजनेचा ओल्ड कस्टम हाऊसमधील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या स्वार्थीपणामुळे फज्जा उडत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहेत. शासनाकडे दाखल होणारा अहवाल अत्यंत रमणीय असला तर प्रत्यक्षात अनेक फाईल्स या जाणीवपूर्वक क्लिअर होत नसल्यामुळे सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे.
मुद्रांक अभय योजनेसाठी ओल्ड कस्टम हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावरील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक प्रस्ताव सादर झाले आहेत. अनेक प्रस्ताव जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत मध्ये सादर केले आहेत. परंतु त्यांच्यावर निर्णय होऊन अद्यापही जुलै २०२४ उजाडला तरी अनेकांना मुद्रांक शुल्क भरण्याबाबत पत्रे दिली गेली नाहीत. त्यांना वारंवार कार्यालयात खेटा माराव्या लागत आहेत. त्यांना हे कर्मचारी, साहेब रजेवर आहेत, ट्रान्सफर झाली, रिटायर्ड झाले, निवडणूक आचारसंहिता आली, ड्युट्या बदलल्या, अशी एक ना अनेक कारणे देत आहेत. त्यामुळे मुद्रांक शुल्क भरण्याची इच्छा असूनही अनेकांना भरण्याबाबत कळवले जात नाही.
याबाबत एका दलालाकडून माहिती घेतली असता असे समजले की, चिरीमिरी मिळाल्याशिवाय तुमच्या फाईलवर कारवाई होत नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री फक्त मोठ्या बाता करतात पण त्यांच्या वरचढ हे मुद्रांक कार्यालयातील अधिकारी आहेत. ते अजिबात चिरिमिरी मिळाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकानी तशी ओळक न सांगता फाईल सबमिट केली तर त्याचीदेखील फाईल क्लिअर करणार नाहीत. तर सामान्यांचे काय? आणि कितीही काहीही करा, हे कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या मनाप्रमाणे मोबदला घेणारच घेणार, म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच मिडियावाल्यांनी गुपचूप स्टिंग ऑपरेशन करावे किंवा थेट कार्यालयात जावून प्रलंबित फाईल्स का ठेवल्या आहेत, त्याची अचानक तपासणी करून जाब विचारला तरच ते शक्य आहे. केवळ जिल्हाधिकारी किंवा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या आवाक्यात हा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग नाही. विधानसभेच्या निवडणूकीत हे कर्मचारी आणि अधिकारी नेत्यांना गोत्यात आणणार आहेत, अशीही चर्चा आहेत.
