मुंबई : मुंबईची लेट्स इमॅजिन ही संस्था गेली ५ वर्ष सातत्याने वाडा आणि विक्रमगड मधील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी शैक्षणिक कार्य करते. नुकतेच या संस्थेने विक्रमगड मधील सुकसाळे, टोपले पाडा आणि रडे पाडा या जिल्हा परिषदेतील तीन शाळांना भेट देऊन छत्री व रेनकोट दिले. इतकेच नाही तर मुलांच्या कल्पना शक्तीला वाव देण्यासाठी चित्रकार श्री बा यांच्या सहकार्याने रंगीला पाऊस ही छत्री रंगविण्याची कार्यशाळा राबविली. ज्यात १०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनांचा शिडकावा छत्रीवर केला…

या बद्दल अधिक माहिती देताना लेट्स इमॅजिनच्या पूर्णिमा नार्वेकर यांनी सांगितले की, जून महिन्यात शाळा सुरु होताना शैक्षणिक साहित्य वाटप केले. विद्यार्थ्यांसाठी नावीन्य पूर्ण उपक्रम करणे आणि त्यातून शाळा गळती रोखण्यासाठी शिक्षणाची गोडी निर्माण करणे, या साठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असतो आणि त्यासाठी असे उपक्रम करीत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *