आजूबाजूच्या गाव, वाड्या, पाड्यांनी दक्षता घ्या – सुदाम परदेशी*
अशोक गायकवाड
ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२७.५१ मी.मी. टीएचपी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून (Overflow) वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचपी इतकी आहे. तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असून, धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता तानसा धरण लवकरच भरुन वाहण्याची (Overflow) शक्यता आहे.*
तरी तानसा धरणाखालील व तानसा नदीलगतच्या/आजूबाजूच्या परिसरातील शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नवेरे, वेलवहाळ, डिंबा व खैरे. भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, महाळूंगे व गणेशपुरी, वाडा तालुक्यातील निभावली, मेट, व गोरांड, वसई तालुक्यातील खानिवडे, घाटेघर, शिरवली, अदने, पारोल, अंबोडे, भटाणे, साईवान, काशीद कोरगाव, कोपरगाव, हेडावडे व चिमणे या गाव, वाड्या, पाड्यातील रहिवाश्यांनी याची नोंद घ्यावी. प्रशासन सर्व प्रकारच्या सुरक्षित उपाययोजनांसाठी सज्ज असून प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे जनतेने पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.
0000
