ठाणे : पक्ष कुणी चोरला? दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही! अशा आशयाचे बॅनर लावून उद्धवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. काय आहे हिंदुत्व, असा प्रश्न विचारत दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व आहे का? याबाबत ठाणेकर जनतेच्या प्रतिक्रिया एका व्हॉट्सॲप नंबरवर दिघे यांनी मागवल्या.
‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधून स्व. आनंद दिघे यांना कमी दाखविण्याचा प्रयत्न निर्मात्याने केल्यावरही दिघे यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला होता. दिघे हिंदुत्व का सोडतील, असा प्रश्न त्यांनी शिंदे गटाला आणि चित्रपट निर्मात्यांना विचारला होता. मातोश्री, बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेना हे एक समीकरण असून, या समीकरणाला डाग लावण्याचे काम हाेत असल्याचे मत दिघे यांनी व्यक्त केले. आता दिघे यांनी होर्डिंगच्या माध्यमातून शिंदे गटावर हल्लाबोल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *