नागरिकांना तिरंगा फडकविण्याचे केले आवाहन
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान विविध उपक्रमांचे आयोजन करीत व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.
यामध्ये स्वच्छ नवी मुंबई मिशनचे महानगरपालिका ब्रँड ॲम्बेसेडर सुप्रसिध्द गायक, संगीतकार श्री.शंकर महादेवन यांनी सहभागी होत महापालिका मुख्यालयातील भेटीप्रसंगी तिरंग्यासह सेल्फी काढत तसेच तिरंगा कॅनव्हासवर स्वाक्षरी करून घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी होत नागरिकांना 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपले घर, कार्यालयात तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह तिरंगा ध्वज हातात धरून झळकवत राष्ट्राभिमान दर्शविला आणि नागरिकांनाही आपल्या देशाविषयीचे प्रेम व्यक्त करण्याची चांगली संधी घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध झाली असल्याचे सांगितले.
00000
