कोळीवाडावासियांच्या आत्मियतेच्या बंदराला
भरत चव्हाण, ओमकार चव्हाण यांच्या मागणीला यश

 

ठाणे : अनेक दशकांपासून चेंदणी कोळीवाड्यातील कोळी समाजबांधवांबरोबरच अन्य समाजातील नागरिकांच्याही आत्मियतेचे बंदर असलेल्या चेंदणी कोळीवाडा मिठबंदर रोड बंदराला चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर असे नवे नाव देण्यात आले आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी आयोजित कार्यक्रमात नव्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
ठाणे शहराच्या स्थापनेपासून चेंदणी कोळीवाड्याला इतिहास आहे. कोळी समाजबांधवांचे वास्तव्य असलेल्या चेंदणी परिसराने अन्य मराठीजनांनाही सामावून घेतले. चेंदणी कोळीवाड्यालगतच्या खाडी किनाऱ्यावर काही वर्षांपूर्वी मिठाचे उत्पादन होत होते. त्यामुळे खाडीवरील बंदराला मिठबंदर रोड असे नाव पडले होते. कालांतराने मिठाचे उत्पादन बंद होऊन, गणेशोत्सवात दीड दिवसांपासून अनंत चतुर्दशीपर्यंतच्या गणेशमूर्तींचे खाडी किनाऱ्यावर विसर्जन केले जात होते. त्यामुळे या बंदराला चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर असे नाव देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी सातत्याने केलेल्या मागणीमुळे या ठिकाणी चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर अशा नावाचा फलक बसविण्यात आला. याबद्दल चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचचे अध्यक्ष विक्रांत कोळी, सुभाष कोळी, कमलाकर कोळी, प्रकाश ठाणेकर, जीत बारांगुळ, हेमंत ठाणेकर, कृष्णकुमार कोळी, गिरीश कोळी, प्रशांत नाखवा, कुणाल भोईर, जमीर कोळी यांच्यासह चेंदणी कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *