रमेश औताडे

 

मुंबई : गणेशोत्सवापाठोपाठ येणारा दसरा, दिवाळी व नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई विभागीय कार्यालयामार्फत शुक्रवारी मिठाई , मावा उत्पादक व वितरकांची बैठक घेण्यात आली. ग्राहकांना दर्जेदार ताजी व सकस मिठाई विक्री करण्यात यावी, अन्न विषबाधेसारखा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त उल्हास इंगवले यांनी केले.

मिठाई खाल्याने विषबाधा होऊ नये म्हणून अन्नसुरक्षा कायदा व नियमानुसार या विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटींचे उल्लंघन न करण्याबाबत अन्न व्यवसायिकांना यावेळी सूचना देण्यात आल्या. यावेळी अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त (मुख्यालय ) उल्हास इंगवले, सहाय्यक आयुक्त (अन्न),सचिन जाधव , गिरीश लिंबूरकर व महेश चौधरी, सह आयुक्त (अन्न ) यांनी मार्गदर्शन केले, यावेळी मिठाई उत्पादक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जैन व इतर पदाधिकारी हे उपस्थित होते. तसेच अन्न व औषध कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (अन्न)आर डी पवार , ज्ञानेश्वर महाले ,अश्विनी रांजणे , नसरीन मुजावर व अन्नसुरक्षा अधिकारी एस एस सावंत आदीं उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *