स्वाती घोसाळकर

मुंबई : मतदार संघाची पुर्नरचना झाल्यापासून महाराष्ट्राची निवडणूक ही हरयाणासोबत गेली तीन टर्म एकत्र झाली आहे.  यंदा पहिल्यांदाच ती एकत्र होत नाहीय. महाराष्ट्रातील राजकारण सत्ताधारांसाठी पोषक नाहीय, आणि म्हणूनच निवडणूक लांबवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विचार भाजपची थिंक टॅंक करीत असल्याची माहीत सुत्रांनी दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहाण यांनीही आज या वृत्ताला दुजोरा देताना भाजपाकडून राष्ट्रपती राजवट लादली जाऊ शकते असे म्हटले आहे.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा यासठी मविआमध्ये जस मतभेद आहेत तसे मतभेद महायुतीत सुध्दा आहेत. आता निवडणूका जाहिर केल्यास एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. त्यापेक्षा विधानसभेची मुदत संपल्यावर राष्ट्रपती राजवट लावल्यास सगळेच माजी होतील. आणि मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा न राहता मोदी या एकाच चेहऱ्यावर निवडणूका लढविल्या जाऊ शकतील असाही विचार होऊ शकतो असेही सुत्रांचे म्हणणे आहे.

शिंदे सरकारबाबत जो असंतोष आहे. आणि एकुणच भाजपाने पक्षफोडाफोडीचे जे राजकारण केले आहे त्याबद्दलचा जनतेच्या मनातील रोष शांत करण्यासाठी निवडणूका राष्ट्रपती राजवट लावून लांबविल्या जाऊ शकतात असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज आपण पाहातोय, मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन वर्ष झालं निवडणुका झालेल्या नाहीत. संविधानातून आपण पॉलिटिकल आरक्षण दिलं. निवडणूक घेणार नसाल तर आरक्षणाचा काय उपयोग आहे? असा सवालही चव्हाण यांनी केलाय. त्यामुळे आता दोन्ही संभावना आहेत. 8 किंवा 9 तारखेला आचार संहिता लागून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे. किंवा गृहमंत्रालयाला थातूर मातूर कारण सांगून राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. इथले राज्यपाल रिपोर्ट देतील, इथली परिस्थिती योग्य नाही , किंवा सुप्रीम कोर्टाकडून विरोधात निकाल आला, तर आमदार निलंबित होतील. अशी अनेक कारण सांगून त्यांना राष्ट्रपती राजवट लागू करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *