ठाणे : आशियाँ फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने भिवंडी तालुक्यात सध्या महिला अत्याचार, महिला सक्षमीकरण यावर जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्या अनुषंगाने आशियाँ फाऊंडेशनने विविध गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात पथनाट्य सादर करून जनजागरण अभियान राबविले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिरेश उजगरे, वेदांत खोत, प्रशांत अदनवाले, रवींद्र शिंदे यांनी परिश्रम घेतले

सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत समाजामध्ये जनजागरण व्हावे तसेच कायद्याची माहिती जनतेला मिळावी, या दृष्टिकोनातून  आशियाँ फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहसीन शेख आणि सरचिटणीस दिपा सावंत – खोत यांच्या नेतृत्वाखाली जनजागरण अभियान सुरू केले आहे. रविवारी या संस्थेच्या वतीने शाळा , कार्यालये, बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण, पालकांची भूमिका, कायदे या विषयी रितेश जाधव, साक्षी मंचेकर,राहुल जगताप, सीताराम खडे, आकाश लोणारे यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नारपोली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे पथनाट्य सादर केले. या प्रसंगी बालगोपाळ मित्रमंडळ, साई प्रसन्न को. सो. नारपोलीचे अध्यक्ष घोसाळकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *