मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेसमोर विरोधीपक्ष राहीलेला नाही. राज ठाकरे सारखे नेतासुद्धा दिल्लीवारी करून आले आहेत. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन पक्षांनी आपलेच ” मोहरे” पसरवून ठेवलेले आहेत. ‘चितपण माझी आणि पटपण माझी आणि सिक्का उभा राहिला तर उभा असलेला सिक्का पण माझाच.. ‘अशी खेळी करणाऱ्यांना जनता धडा शिकवणार आहे असे करुणा धनंजय मुंडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत राजकारणातील वास्तव मालिकेचा पहिला अंक सादर केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकच आहेत याची मी प्रत्यक्षदर्शी आहे. ज्यावेळेस माझे पती धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. सन 2014 पासून त्यांचे साट-लोट सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवली आता जी उरलेली शिंदे गटाची शिवसेना आहे ती सुद्धा संपवण्याचा प्रयत्न चालूच आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तिकीट वाटपाचा जो खेळ मांडला आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या तिकीटाचा तिढा अजून सुटलेला नाही. असे करुणा मुंडे म्हणाल्या.
उदाहरणार्थ सांगायचं झालं तर, शरद पवार आणि अजितदादा पवार एकच आहेत. वेगळे असते तर बीड-लोकसभेची उमेदवारी मला ( करुणा धनंजय मुंडे) ला दिली असती. यावरून असे स्पष्ट होते की हे चाळीस ४० आमदार फक्त ईडीच्या भितीपोटी जेलमध्ये न जाता सत्ताधारी पक्षात गेलेले आहेत. आता शरद पवार गटाने बजरंग बाप्पा सोनविणे हा धनंजय मुंडेचाच मोहरा उभा केला आहे. यावरून दोन पक्ष हे संगणमताने निवडणूक लढत आहेत असेच दिसत आहे असे करुणा मुंडे यांनी सांगितले.
बारामती आणि धाराशिव, उस्मानाबाद लोकसभेचे उदाहरण आहे . सुप्रिया सुळे पण आमचीच सुनेत्रा पवार पण आमच्याच आणि धाराशिवच्या अर्चना पाटील पण आमच्याच असे गणित मांडले आहे. येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत २०० जागा स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून करुणा धनंजय मुंडे लढविणार आहे अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली.
