उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे

शहापूर : नागरीकरण वेगाने होणाऱ्या शहापूर शहराला जादा पाणीपुरवठा होण्यासाठी भातसा नदीतून वाढीव आरक्षण मंजूर करण्यासाठी माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले असून, शहापूरवासियांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहापूरमधील वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी नगरपंचायतीमार्फत नवी पाणीयोजना साकारण्यात आली आहे. मात्र, भातसा नदीवरुन शहापूर शहरासाठी पाणी आरक्षण कमी असल्यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा गायत्री भांगरे, उपनगराध्यक्ष विजय भगत, भाजपाचे शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्यासह नगरसेवकांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची काल शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शहरासाठी वाढीव पाणीआरक्षण मंजूर करण्याची विनंती केली.

सध्या शहापूर नगरपंचायत क्षेत्रासाठी भातसा धरणातून १.१८६ दशलक्ष घन मीटर पाणी आरक्षण मंजूर केलेले आहे. शहरात प्रती माणशी दैनंदिन १३५ लिटर वापर गृहीत धरला आहे. तर वाढत्या लोकसंख्येनुसार भातसा नदीवरुन ३.१२५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण देण्याचा प्रस्ताव नगरपंचायतीमार्फत जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला आहे. भातसा नदीच्या क्षेत्रातील पाणी स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध करण्याची तरतूद आहे. त्यानुसार वाढीव पाणी आरक्षणासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे.

शहापूरमधील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी कटीबद्ध असून, आपण या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू. तसेच शहापूरवासियांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शहापूर नगरपंचायतीच्या शिष्टमंडळाला दिले.

राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहापूरमधील वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी नगर पंचायतीमार्फत नवी पाणीयोजना साकारण्यात आली. मात्र, भातसा नदीवरुन शहापूर शहरासाठी पाणी आरक्षण कमी असल्यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा गायत्री भांगरे, उपनगराध्यक्ष विजय भगत, भाजपाचे शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, मुख्याधिकारी  शिवराज गायकवाड यांच्यासह नगरसेवकांनी माझी काल शहापूर येथे भेट घेतली. तसेच शहरासाठी वाढीव पाणीआरक्षण मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करण्याची विनंती केली. या मागणीसंदर्भात फडणवीस जी यांच्याबरोबर संपर्क साधला असून, लवकरच हा प्रश्न सुटेल. तसेच शहापुरातील प्रत्येक घरात पुरेसे पाणी उपलब्ध होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *