राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे जितेंद्र आव्हाड आहे – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर

ठाणे : सन २०१४, सन २०१६, सन २०१९ सन २०२२ या साली काय घडले हे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शरदचंद्र पवारसाहेबांना विचारायची हिंमत दाखवावी.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजितदादा, प्रफुल्लभाई भुजबळसाहेब, तटकरेसाहेब आदी अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी वाढविली. राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे जितेंद्र आव्हाड आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा  एकदा नवी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती आणि कळवा येथे सांस्कृतिक कार्यक्रम होता, शिमग्याचा पालखी नाचविण्याचा, त्या सांस्कृतिक व्यासपीठावरून बोलताना पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेसाहेब यांच्यावर त्यांनी काही आरोप केले. याचा मी निषेध करतोच पण माझा एक त्यांना थेट प्रश्न आहे. हे सगळे आरोप आमच्यावर करण्यापेक्षा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांना जर त्यांनी जावून विचारले की, २०१४ साली विधानसभेचे संपूर्ण निकाल यायच्या आधी बिनशर्त पाठिंबा भाजपला कोणी द्यायला लावला? २०१६ साली भाजपच्या केंद्रीय शिर्ष नेतृत्वाबरोबर ज्या काही बैठका झाल्या ह्या आपल्या मान्यतेने झाल्या की नाही ? २०१९ मध्ये पुन्हा तो प्रयत्न झाला, पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशिर्वादाने झाला ? राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठविली गेली ? २०२२ ला सत्तांतर होत असताना त्थावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या ? हे सगळे प्रश्न जर डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना धिचारले तर ते अधिक स॔युक्तिक ठरेल आणि माझा त्यांना हा ही सल्ला आहे की, आताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. एकनाथ खडसेजी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, अशाप्रकारची घोषणा त्यांनो केली आहे. त्यांना आव्हाड यांनी जावून विचारावे की  साहेबांनी आपल्याला काय कमी केले होते ? २०२० मध्ये आपला पक्ष प्रवेश झाला आणि राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अपले नाव पक्षाकडून गेले. राज्यपाल नियुक्त आमदारकी आपल्याला मिळाली नाही तरी २०२२ ला लगेच जुनमध्ये ज्या निवडणूका झाल्या त्यामध्ये माननीय एकनाथराव खडसे यांना पक्षातर्फे विधानपरिषदेचे आमदार बनविण्यात आले. त्या एकनाथराव खडसे यांना प्रश्न विचारले तर अधिक बरे होईल. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर माननीय अजितदादांचे,  माननीय सुनील तटकरेसाहेब यांचे असलेले योगदान महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातील कार्यकर्त्यांना माहित आहे. पहिले प्रांताध्यक्ष छगन भुजबळसाहेब यांच्या बंगल्यातुन पक्षाचे नाव, चिन्ह, पहिला झालेला राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा याचे नियोजन करण्यात आले होते. त्या काळापासून या नेत्यांचे योगदान इतके आहे की जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न विचारण्याची पात्रता किंवा कुवत देखील नाही. सातत्याने सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे हे आमच्या नेत्यांना ते बोलत असतात पण राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहे, असा सणसणीत आरोप प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला.

आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सुरुवात केली. पण माननीय अजितदादा पवार, छगन भुजबळसाहेब, सुनील तटकरेसाहेब, प्रफुल्लभाई पटेल आदी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्याचे काम केले. पण डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी मात्र ठाणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस संपविण्याचे काम केले. ज्या गणेश नाईकांचा दुस्वास तुम्ही आयुष्यभर केलात, त्यांच्याबद्दल

स्वर्गीय वसंतरावजी डावखरे यांच्याबद्दल वारंवार शरदचंद्र पवारसाहेबांना खोटनाट सांगत राहिलात, यामुळे कितीतरी चांगली लोक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेली. याचा विचार, आत्मपरीक्षण जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः करावे. इतके दिवस मी त्यांना इतिहासकार डाॅ जितेंद्र आव्हाड म्हणायचो आता.पण आता ते रामदास पाध्येंसारखे किंवा जाॅनी लिव्हर सारखे नकलाकार बनणार असतील तर माहीत नाही. ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते हे त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले त्यामुळे डाॅ जितेंद्र आव्हाड होश मे आवो, आपली पायाखालची वाळू आता सरकत चालली आहे. मी तर त्यांना २४ तासाचे आव्हान दिले होते की राष्ट्रवादीचे कार्यालय अधिकृत आहे की अनधिकृत आहे, हे त्यांनी कळवेकरांना सांगावे पण त्यांनी उत्तर दिले नाही. आता मी त्यांना पुन्हा चॅलेंज देत आहे. त्याही वेळेला त्यांनी कांगावा केला की, खारलॅण्डचे ग्राऊंड कोणी बंद केले ? खारलॅण्ड चे ग्राऊंड बंद व्हावे ही राष्ट्रवादीची अजिबात इच्छा नव्हती. त्या ग्राऊंडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत, कळवेकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा पण ते ग्राऊंड त्यांनी जे व्यक्तिगत जहागीर केली त्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे. अट्टाहास करुन घेतलेल्या भिवंडीच्या जागेवर महाविकास आघाडीतुन सुरेश उर्फ बाळ्यामामा यांना उभे केले आहे तिथे जाऊन त्यांचा प्रामाणिक प्रचार करावा, जिंकविण्यासाठी प्रयत्न करावा, ही त्यांना सदिच्छा. पण येत्या २ जूलैला कळेल की आपल्यामध्ये जिल्ह्याचे  नेतृत्व करण्याची तरी क्षमता आहे का ? महाराष्ट्र तर खूप दूरची बात झाली. कोण कोणाचे घर फोडत नसतो. ५ जुलैला एक वेगळी, स्पष्ट राजकीय भूमिका एमटीएनएल मध्ये अजितदादांनी घेतली तेव्हा माझ्यासह महाराष्ट्रातील कार्यकर्त्यां, जनतेला वस्तुस्थिती, सत्य माहित पडले. सातत्याने आपल्या अकलेचे तारे त्यांनी तोडू नयेत, असा टोला प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मारला.

भाऊ आणि बहिण हे जगातील एक खूप महत्वाचे नाते आहे. या नात्यावर डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी बोलू नये. त्यांच्या घरातील तो कौटुंबिक प्रश्न आहे. बोलायचे असेल तर काही मी देखील बोलू शकतो. माननीय अजितदादा व सुप्रियाताई यांच्या राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी त्यांचे घरातील संबंधांवर भावाबहिणीच्या संबंधांवर डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी बोलू नये. कधीतरी त्यांना देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की, तुमचे तुमच्या बहिणीशी संबंध कसे आहेत ? हे त्यांनी स्वतः देखील तपासून घ्यावे. बायकोचे आणि नवर्‍याचे नाते देखील पवित्र आहे त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधांवर जितेंद्र आव्हाड यांनी बोलू नये. मी एकच सल्ला देईल तुमच्या बहिणीचे, पत्नीचे संबंध अधिक कसे सुदृढ आणि चांगले होतील त्याकडे त्यांनी प्रयत्न करावे.

डोमकावळ्यांचे देखील अनन्यसाधारण महत्व आहे. आपण जेव्हा सर्व पित्रीला पिंडदान करतो तेव्हा सर्वजण कधी येउन पिंडाला शिवतो यासाठी डोमकावळ्यांची वाट बघत असतात. तेव्हा या प्रकृतीमध्ये,  देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक पशू, पक्षी, मनुष्य याचे महत्त्व आहे. यामुळे फार काही त्यांनी डोमकावळा, गद्दार, घरफोड्या म्हणू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही योग्य ती कायदेशीर काळजी घेत आहोत. आमचे ज्येष्ठ विधितज्ञ आमची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जे काही निकष आम्हाला चिन्हाबाबत आखून दिलेत,  ते सगळे योग्य त्या परीने आम्ही पाळत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाकडून देखील एक नेता सातत्याने मॅटर सबज्युडीश असताना त्यांना कायम ट्विट करण्याची सवय आहे ती त्यांनी करु नये. अशाप्रकारचे ऑब्झर्वैशन सुप्रिम कोर्टाच्या शेवटच्या सुनावणीत करण्यात आले होते.

अंत भला तो सब भला. विजय शिवतरे हे महायुतीचा पुरंदर येथे मेळावा घेत आहेत. या मेळाव्याला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. ही चांगली गोष्ट आहे. महायुतीच्या आमच्या उमेदवार सौ सुनेत्राताई अजित पवार या मोठ्या मताधिक्याने बारामतीत मतदारसंघातुन निवडून येतील. सुजय विखे पाटील असोत  की  कोणाही उमेदवाराला धमकी मिळत असेल तर त्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने व पोलिसांनी तत्काळ घ्यायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *