मुंबई : जे.एम. बक्षी कंपनीतील कामगारांना कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष  ॲड. एस. के. शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली सरासरी पगारवाढ ५४०१ रुपये भरघोस पगारवाढीचा करार करण्यात आला आहे.
भारतातील प्रमुख बंदरांमधील सर्वात जुनी असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने जे. एम बक्षी या कंपनीमध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२८  असा ४  वर्षाचा वेतन करार केला आहेम या वेतन  करारामुळे कामगारांना कमीत कमी ४४९६ रुपये तर जास्तीत जास्त ६९५३ रुपये पगार वाढ झाली आहे. सरासरी पगारवाढ ५४०१ रुपये आहे. या वेतन करारावर युनियनच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष  ॲड. एस. के. शेट्ये, सेक्रेटरी विद्याधर राणे,  खजिनदार विकास नलावडे,  कामगार प्रतिनिधी म्हणून  अरुण खाडे आणि  प्रवीण जाधव तर व्यवस्थापनाच्या वतीने उपाध्यक्ष व एच. आर. ई. अरुमुगम आणि मॅनेजर व एच. आर. रितूराज ढाकणे यांनी सह्या केल्या आहेत, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *