सांगली : आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरुन वाढवून ७५ टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा २५ टक्क्यांमध्ये समावेश करता येईल. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, आम्ही त्याला जाहिर पाठींबा देऊ असेही शरद पवार म्हणाले.
मराठा आरक्षण मिळावे ही लोकांची भावना असल्याचे शरद पवार म्हणाले. इतरांचे जे आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असंही पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टिका केली. त्यांना एकही जागा निवडूण आणता आली नाही. ते लोक माझ्यावर बोलतात, हे प्रसिद्धीसाठी बोलत असतात असं म्हणत शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला.
देशाचा गृहमंत्री भाषणात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा असे बोलतात. लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांच्या १८ ठिकाणी सभा झाल्या होत्या. यामध्ये १४ ठिकाणी त्यांचा पराभव झाल्याचे शरद पवार म्हणाले. त्यामुळं यावेळी देखील त्यांनी जास्त सभा घ्याव्यात असा टोला शरद पवार यांनी लगावला.
