मुंबई : एसटी महामंडळाच्या मुंबई विभागातील ६९ कर्मचाऱ्यांची बदली आचासंहितेपूर्वी करण्यात आली होती. यामध्ये चालक वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी यांचा समावेश आहे. परंतु नवीन बॅच अद्याप रुजू झाली नाही त्यामुळे बदल्या आदेश निघूनही बदल्या प्रलंबित आहेत.

गेली १५ ते २० वर्षांपासून मुंबई प्रदेशात ( कोकणात)काम करणाऱ्या चालकांना गावी बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र नुकत्याच काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामूळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला होता.मुंबई विभागातील ६९ कर्मचाऱ्याच्या बदल्यांचा आदेश निघाला पण नवीन कर्मचाऱ्यांची बॅच येत्या आठवड्यात रुजू होणार आहे.

यामध्ये ४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता गर्दीचा हंगाम असल्याने नवीन कर्मचारी रुजू होण्यापूर्वी जुन्या कर्मचाऱ्यांची बदली झाली तर कामाचा ताण वाढेल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्रशासन बदल्या करत आहे चांगली बाब आहे. मुंबईत विदर्भ मराठवाडा , पश्चिम महारष्ट्र या भागातील बरेचजण नोकरी करत आहेत. त्यांची गैरसोय होत होती त्यांना दिलासा मिळेल. बदल्या मागणारे कमी कर्मचारी आहेत ज्यांचे अर्ज आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या व्हाव्यात.

श्रीरंग बरगे , सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *