मुंबईत टिळक भवनमध्ये प्रवेश सोहळा संपन्न

मुंबई : अ.भा. काँग्रेस समितीच्या सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस श्रीमती राणी आगरवाल यांच्या नेतृत्वाखाली भिंवडी तालुक्यातील भाजप,शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गट, आणि बसपच्या ३५० हून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आज रविवारी दादर टिळक भवन येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी या सर्वाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षात स्वागत केले.प्रवेश करणाऱ्यांमध्ये संत निरंकारी सेवा ट्रस्टचे ठाकूर शामसिंग सोमवंशी,भाजपचे फूलबदन  यादव, भाजपचे भिंवडी संघटक सचिव संजय सिंग, शिंदे गट शाखाप्रमुख  इंद्रजित पटेल,महिला शाखा संघटक हेतल सोनी,राष्ट्रवादी (अप)चे ब्लाॅक अध्यक्ष अमोल चव्हाण,आरपीआय आठवले गटाचे सुनिल सिंग ठाकूर, बसपच्या भिवंडी उपाध्यक्ष जवाहरलाल सरोज आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याप्रसंगी काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे,रेहाना अन्सारी, डाॅ.सय्यद कादीर ,दिनेश शेट्टी,सुजाउद्दीन अन्सारी,शरद पाटील,अहमद सिद्दीकी,शकील अन्सारी,इस्तियाक खान,सोहेल खान अश्फाक हाश्मी, सुलतान सिद्दीकी,डाॅ.समसगीर,  नफीज अन्सारी आदी काँग्रेसचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेसमध्ये आज  प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षात सन्मान ठेवला जाईल, असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले. यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व  उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *