मुंबई : पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे.मोठ मोठी शहरे अपु-या पाणी पुरवठ्यामुळे चिंतीत आहेत. भूगर्भातूनही पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. वाढती लोकसंख्या व वाढते उद्योग यांच्यामुळे एकीकडे पाण्याती मागणी वाढत आहे तर दुसरीकडे अवेळी व अपुरा पडणारा पाऊस पाणी पुरवठ्याचा पश्न बिकट करीत आहे.मुंबईसह अनेक शहरात जुलै महिन्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यानं या शहरात १५ टक्के पाणी कपात करावी लागली होती.मात्र ऑगष्टपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे १० वर्षात प्रथमच राज्यभर चांगला पाऊस पडल्यामुळे धरणे व तलाव ओसंडून वाहू लागले. म्हणून सर्व महापालिकांनी पाणी कपात मागे घेतली.याचा अर्थ पाण्याची उधळपट्टी करायला परवानगी असा होत नाही.परंतु पावसाच्या पाण्याचा साठा हा एक सरळ व साधा पण महत्वाचा मार्ग आहे.
यापुढे यासंबंधात सर्वांनीच सतर्क रहावे व पाणी समस्या काही प्रमाणात सोडविण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे या हेतूने पर्जन्य जलसंधारण ,पाणी बचत,पाणी माफिया, जलप्रदुषण,जलपुर्नभरण,
जलसिंचन प्रकल्प,जलशिवार योजना,पाणलोट विकास, ब्रिमस्टोवाड प्रकल्प, मिठीनदीची समस्या,नदीजोड प्रकल्प यासह पाण्याशी संबंधित विषयावर याविषयातील जाणकार लेखकांकडून या अंकात चर्चा घडवली आहे.
`विश्वकौतुक´ या पाणी विषयक दिवाळी अंकासाठी पाणी या विषयाशी संबंधित कथा,लेख,कविता,व्यंगचित्र,
वात्रटिका, विनोद आदि प्रकारचे साहित्य २० ऑक्टोबर पर्यंत “विश्वकौतुक” दिवाळी अंक ,११८/बी, जिजामाता नगर, काळाचौकी,मुंबई या पत्त्यावर अथवा rajendrasalaskar25@gmail.com या मेल आयडीवर युनिकोड स्वरूपात ओपन फाईल पाठवावे असे आवाहन या दिवाळी अंकाचे संपादक राजेंद्र साळसकर यांनी केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *