अनिल ठाणेकर
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट या महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने नजीब मुल्ला यांनी सोमवारी, १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंब्रा कळवा के विकास के लिए नजीब है ना, मी नजीबची लाडकी बहीण या घोषणांचे फलक घेऊन लाडक्या बहिणींनी रॅलीत सहभाग घेतला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते, अल्पसंख्याक महामंडळाचे चेअरमन मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आरपीआय (आठवले गट) ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, पीआरपी ठाणे जिल्हाध्यक्ष महेंद्र पवार यांच्या उपस्थितीत आदी मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.
शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट महायुती,राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांनी, सोमवारी २८ ऑक्टोबर, रोजी १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघातून हजारो महायुती कार्यकर्त्यांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, राजन किणे, अनिता किणे, राजेंद्र साप्ते, उमेश पाटील, मोरेश्वर किणी, विश्वनाथ भगत, गणेश साळवी, मनोज लासे, विजया लासे, गणेश कांबळे, वहिदा खान, अंकिता शिंदे, रुपाली गोटे, आशरीन राऊत, हफिजा नाईक, प्रियांका पाटील, हसिना अब्दुल अजीज शेख, यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. दत्तुवाडी, मुंब्रा स्टेशन जवळ, मुंब्रा स्टेशन फ्लायओव्हर, दत्तुवाडी-शंकर मंदिर-कौसा कब्रस्तान,-कौसा तलावपाळी ते एम. एम. व्हॅली सर्कल, कौसा या मार्गाने, मुंब्रा कळवा के विकास के लिए नजीब है ना, मी नजीबची लाडकी बहीण या घोषणांचे फलक घेऊन हजारो लाडक्या बहिणींनी रॅलीत सहभाग घेतला. यावेळी महायुती शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे भगवे, तिरंगी आदी विविध रंगी झेंडे फडकावत, ढोलताशांच्या गजरात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या टोप्या घालून मोठ्यासंख्येने रॅलीत सहभागी झाले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.
चौकट
पाणी प्रश्न सोडविणार, विकास भूखंड अतिक्रमणापासून वाचवून त्याचा विकास करणार, सर्व गोरगरीबांच्या संपर्कात राहून त्यांची कामे करणार, घोषणा कमी करणार जास्त कृती करुन लोकांची कामे करणार ,१५ वर्ष खोटी आश्वासने, कृती शून्य कारभार करणाऱ्यांनी भाजपची खोटी भिती निर्माण केली आहे. कळव्याची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी हायवेला जोडणारा काऊंटर रिंग रुट तयार करणार, विटाव्याच्या पलिकडे नवीन पूल बांधणार, पारसिक च्या मागून नवीन सर्विस रोड बांधणार आहोत. या मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी आपल्या भावाला, आपल्या मुलाला विजयी करा, असे आवाहन महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदा संघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी केले आहे.
