मुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला वातावरण अनुकूल असून काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिला असून या संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अनिल चौगुले यांनी पाठिंब्याचे पत्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांना दिले आहे.

मुंबई शहरात नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे लाखो रहिवासी आहेत, हा समाज काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे चौगुले यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल खासदार वर्षा गायकवाड यांनी नाथपंथी डवरी समाजाचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *