मुंबई : झारखंड विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने दमदार कामगिरी केली आहे. हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस युतीने ६० जागांवर विजय मिळवला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी येथे ४२ जागांची आवश्यकता आहे. तर, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने २१ जागांवर विजय मिळवला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत JMM-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल (RJD) युतीने ४७ जागा जिंकल्या. जेएमएमने स्वबळावर ३० जागा जिंकल्या होत्या. तर, २०१४ मध्ये १९ जागा होत्या. भाजपला ८१ पैकी फक्त २५ जागा मिळवता आल्या होत्या.

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बरेच चर्चेत आले होते. ते तुरुंगवासात होते तेव्हा त्यांच्या जागी चम्पाई सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. इंडिया अलायन्सच्या विजयामागे अनेक कारणे असल्याचे मानले जाते, ज्यामध्ये हेमंत सोरेन सरकारच्या कार्यपद्धतीवर जनतेचा विश्वास आणि एनडीएविरोधातील सत्ताविरोधी लाट ही प्रमुख कारणे आहेत.

 प्रत्येक निवडणुकीत नवं सरकार स्थापन करण्याचा या राज्याचा इतिहास आहे. मात्र, या इतिहासाची पुनर्रावृत्ती यंदा झाली नाही. कारण, पुन्हा सोरेन यांच्या जेएमएम-काँग्रेस युतीने येथे सत्ता काबिज केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *