केतन खेडेकर
बहाई समाजातील जगभरातील लोक त्यांचा वार्षिक उत्सव लवकरच साजरा करणार.
मुंबई : हा वार्षिक उत्सव त्या कालावधीस चिन्हांकित करतो ज्यादरम्यान बहाई धर्माचे अवतार-संस्थापक, बहाउल्लाह ह्यांनी स्वतःला या युगाचे प्रेषित म्हणून घोषित केले. ही घोषणा बहाउल्लाह ह्यांनी २१ एप्रिल १८६३ रोजी बगदादमधील टायग्रिस नदीकाठी एका बागेत केली ज्या बागेला त्यांनी ‘रिझवान’, म्हणजे ‘स्वर्ग’ असे नाव दिले. या काळात बहाउल्लाहांनी त्याच्या शिकवणींच्या केंद्रस्थानी असलेल्या मूलभूत आध्यात्मिक तत्त्वांची घोषणा केली – मानवतेच्या जीवनाच्या उत्क्रांतीच्या एका नवीन टप्प्यावर येण्याचे संकेत, शांतता आणि हिंसेचा अंत.
सोबतच याच रिझवान उत्सवाच्या पहिल्या दिवशी जगभरातील हजारो भागात बहाई अनुयायी त्यांच्या स्थानिक प्रशासकीय परिषदांसाठी मतदान करतात. या बहाई निवडणुका अद्वितीय आहेत कारण या गुप्त मतदानाने व मतांच्या संक्ख्याधिक्याच्या बळावर आणि उमेदवारी, नामांकन व प्रचार यांच्याशिवाय पार पडतात. मतदान करतांना बहाई भाविक निर्विवाद निष्ठा, निःस्वार्थ भक्ती, प्रशिक्षित मन, मान्यताप्राप्त कुवत आणि संपन्न अनुभव अशा प्रकारे मुल्यांकन करून तसेच वयोमान, विविधता, लिंग किंवा अशा अन्य बाबींचा यथोचित विचार करून व्यक्तींची निवड करतात.
बहाई धर्म स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाही पद्धतीने निवडलेल्या नऊ-सदस्यीय परिषदांद्वारे आपले कामकाज चालवते. ही बहाईं भाविकांसाठी एक पवित्रतम प्रक्रिया आहे, ज्यावेळी ते संपूर्णतः ईश्वराकडे उन्मुख होतात आणि उद्देशाच्या पावित्यासह, चेतनेच्या स्वातंत्यासह आणि हृदयाच्या शुध्दतेसह बहाई निवडणुकींमध्ये सहभागी होतात.
