‘राम-जी’ विधेयक
लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली : देशातील ग्रामीण जनतेला दोन दशके रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं नाव आणि स्वरूप बदलणारं ‘व्हीबी-जी राम-जी’ विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला सभागृहात कडाडून विरोध केला.
विरोधी खासदारांच्या गोंधळादरम्यान सरकारने हे विधेयक पारित केलं आहे. यावेळी निषेध म्हणून विरोधकांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अंगावर कागद फेकले. गेल्या काही दिवसांपासून या विधेयकावरून वाद होत आहे.
नव्या रोजगार हमी योजनेतून ‘महात्मा गांधी’ हे नाव वगळण्यात आलं असून या योजनेचं ‘विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड अजीविका मिशन’ (व्हीबी-जी-राम-जी) असं नामांतर करण्यात आलं आहे.
