नवी मुंबई : यंदाच्या २९ महानगर पालिकांच्या निवडणूकीत सर्वाधिक वादग्रस्त राहीलेल्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत अखेर भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी चँलेंज दिल्याप्रमाणे भाजपला एकहाती सत्ता मिळवून देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा टांगा पलटी केला.
नवी मुंबईत भाजपाने ७२ जागा जिंकल्या तर शिंदेंची शिवसेना केवळ २८ जागां जिंकू शकल्या..
नवी मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार ताकद लावली होती. त्यातून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्धही झाले होते. एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला, तर गणेश नाईकांनीही त्याला प्रत्युत्तर देत शिंदेंना टांगा पलटीचे आव्हान दिलं होते.
एकनाथ शिंदे यांच्याकडे हरामाचा पैसा आहे, नवी मुंबईच्या विकासासाठी असलेल्या सिडकोच्या जमिनी त्यांनी विकल्या आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला. भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं तर शिंदेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांचा ‘टांगा पलटी, घोडे फरार’ करणार असं आव्हान गणेश नाईकांनी दिलं होतं. आता गणेश नाईकांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला आणि नवी मुंबईवर पुन्हा एकदा सत्ता काबीज केली.
