मीरा भाईँदरमध्ये फोर टू का वन;
चार पदरी पुलाचे दोन पदर गायब
अरविंद जोशी
मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या ब्रिजमध्ये फोर टू का वन करण्यात आले आहे. या चार पदरी नवीन उड्डाणपूलाचे दोन पदर गायब झाल्याने सध्या सोशल मीडियावर या पुलाने धुमाकूळ घातला आहे.
या पुलाच्या विचित्र रचनेमुळे नागरिक आणि नेटिझन्स आश्चर्य व्यक्त करीत आहेत. प्रशासकीय नियोजन शुन्यतेवर जबरी टिका होत आहे. शहरातील मिरा रोड ते भाईंदरला जोडणाऱ्या या उड्डाणपुलाची सुरुवात चारलेन च्या भव्य रुंदीने होते. मात्र, पुलाच्या मधोमध गेल्यावर हा रस्ता अचानक अरुंद होतो आणि दुसऱ्या टोकाला तो केवळ 2-लेनचा उरतो. या पुलाच्या रचनेमुळे ‘बॉटलनेक’ परिस्थिती निर्माण झाली आहे. चार पदरी रस्त्यावरून वेगाने येणारी वाहने जेव्हा अचानक दोन पदरी अरुंद रस्त्यावर येतात, तेव्हा तिथे वाहनांच्या रांगा लागण्याची आणि अपघातांची शक्यता वाढली आहे. याबाबत अजून संबंधित एमएमआरडीए विभागाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
