वीज निर्मिती प्रोजेक्टने केले शेतीचे नुकसान
आदिवासी शेतकरी हवालदिल
मुरबाड प्रतिनिधी (राजीव चंदने)
विज निर्मितीसाठी तालुक्यातील पाटगाव मालेगाव येथे प्रोजेक्टचे काम सुरू असताना मोठ्या प्रमाणात माती भराव केला आहे. या पावसामुळे काही माती बाजूला असलेल्या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतीत गेल्याने भात लागवड करता आली नाही. लक्ष्मण आलो झुगरे असे आदिवासी शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी अनेक वेळा प्रोजेक्ट मधील अधिकारी कर्मचारी यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी व सदरची माती काढून माझी जमीन पूर्ववत करुन देण्यासाठी सांगितले परंतु त्यांनी न ऐकल्याने शेतकऱ्यांने तहसीलदार मुरबाड यांना विनंती करून निवेदन देऊन कळविले आहे,की आमच्या शेतीची नासधूस करुन आम्हाला शेतीचे उत्पन्न घेण्यास अडचण निर्माण केली असल्याचा आरोप संबंधित शेतकरी यांनी केला आहे. आदिवासी शेतकऱ्याला येत्या आठ दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास व त्यांची सुपीक जमीन पूर्ववत करुन न दिल्यास नुकसान ग्रस्त शेतकरी कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तहसील कार्यालय समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असे आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी दैनिक बित्तंबातमीशी बोलतांना सांगितले.
